Mauvin Godinho: होय, सर्वाधिक महागडी कार वापरतो, पण... जाणून घ्या काय म्हणाले वाहतूक मंत्री

गुदिन्होंकडे एमजी ग्लेस्टर
Mauvin Godinho
Mauvin GodinhoDainik Gomantak

Mauvin Godinho: काही काळापुर्वी राज्यातील मंत्र्यांकडे असणाऱ्या वाहनांविषयी सरकारने माहिती जारी केली होती. त्यानुसार गोव्यात राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांपैकी सर्वाधिक महागडी कार वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडे होती, असे स्पष्ट झाले होते. त्यावरून मंत्री गुदिन्हो यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Mauvin Godinho
Goa Cabinet Decision: राज्यात 5G नेटवर्कच्या पायाभूत सुविधांसाठी टेलीकॉम धोरणांत करणार बदल

गुदिन्हो म्हणाले की, राज्यातील इतर मंत्र्यांपेक्षा सर्वाधिक महागडी कार वापरणारा मी मंत्री आहे, अशी चर्चा काही काळापुर्वी झाली होती. मी सर्वाधिक महागडी कार खरेदी केल्यावरून ही चर्चा झाली होती.

पण मी सांगेन की, एखाद्या मंत्र्याला कार खरेदी करायची असेल तर त्याला 30 लाख रूपये सरकारतर्फे मिळतात. मी 36 लाखाची कार खरेदी केली होती. मला केवळ वरचे 6 लाख रूपये माझ्या खिशातून द्यावे लागले होते.

गुदिन्हो यांच्याकडे 36 लाख 35 हजार रुपये किमतीची ‘एमजी ग्लेस्टर’ आहे. त्या खालोखाल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे 35 लाख 24 हजार रुपये किमतीची फॉर्च्युनर व 24 लाख 77 हजार रुपयांची ‘इनोव्हा क्रेस्टा’ ही वाहने आहेत.

Mauvin Godinho
Konkani Literature Festival: 22 व्या युवा कोकणी साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर; अध्यक्षपदी 'या' लेखकाची निवड

दरम्यान, गुदिन्हो यांनी 24 मार्च 2021 मध्ये ही कार घेतली होती, त्यांच्या ‘एमजी ग्लेस्टर या कारची किंमत आता 38 लाख रुपये इतकी आहे. राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकरांकडे 34 लाख 50 हजारांची फॉर्च्युनर आहे.

कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्याकडे जीप मेरिडियान ही 32 लाख 40 हजार रुपये किमतीची गाडी आहे.

मच्छिमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्याकडे किया कार्निवल (30 लाख 99 हजार रुपये), कृषी मंत्री रवी नाईक यांच्याकडे 26 लाख 72 हजार 500 रुपये किमतीची इनोव्हा क्रेस्टा आहे. 16 जून 2022मध्ये राज्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांना 26 लाख 66 हजार 500 रुपये किमतीची इनोव्हा क्रेस्टा देण्‍यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com