गोवा : कोरोना संसर्ग वाढत असताना निर्बंध रद्द करण्याचे कारण काय?

दैनिक गोमंतक
गुरुवार, 8 एप्रिल 2021

राज्यात गेल्या काही दिवसंपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मात्र गोवा राज्यसरकारचे यासंबंधी खबरदरीच्या उपाययोजना राबविण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

पणजी : राज्यात गेल्या काही दिवसंपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मात्र गोवा राज्यसरकारचे यासंबंधी खबरदरीच्या उपाययोजना राबविण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. राज्यात ज्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता त्यावेळी सरकारने निर्बंध लादले आणि आता संसर्ग वाढत असताना निर्बंध काढून टाकल्याने गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे.  इतकेच नव्हे तर, राज्यात भाजपचे नेतृत्व बहुजन समाज करत असला तरी भाजप पक्षाची मानसिकता ही बहुजन आणि अल्पसंख्याक विरोधी असल्याचे चित्र यातून दिसून येते, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला. (What exactly is the reason for lifting the ban when corona infection is on the rise? Question by Girish Chodankar) 

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी असताना सरकारने राज्यात 144 कलम लागू केले. मात्र आता कोरोना प्रकरणं वाढत असताना हे कलम मागे घेण्याचं नेमकं  कारण काय, असा सवाल गिरीश चोडणकर यांनी केला आहे.  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मर्यादीत असतानाही  शिगमोत्सव, इस्टर आणि शब-ए-बरात हे पारंपारिक उत्सव रद्द करण्यात आले. मात्र दुसरीकडे भाजपा आमदारांचे वाढदिवस, स्थापना दिवसाचे सोहळे मोठ्या थाटामाटात साजरे करण्यात आले. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मांद्रेमच्या पोलिस महासंचालकांनी सर्वात आधी मुख्यमंत्री, सर्व भाजपा कार्यकर्ते आणि हुनर हाट कार्यक्रम आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे. 

मडगावात पालिका निवडणूकीसाठी 22 अर्ज दाखल

राज्य दिवाळखोरीत निघालं असून खाणबंदीमुळे लाखो लोकांची उपासमार होत आहे. राज्यातील नागरिक कोरोना महामारीने राज्यावर आर्थिक संकट ओढवलं आहे. या संकटातून नगरिकान बाहेर काढण्यासाठी सरकार कोणत्याही उपाययोजना राबवताना दिसत नाही.  खाणबंदीमुळे  बेरोजगार झालेल्या लोकांसाठी केंद्राकडे आर्थिक पॅकेज मागण्यात आले, मात्र केंद्रसरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. पण गोवा मुक्ती हीरक महोत्सवासाठी  300 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले. भाजपची ही मानसिकता म्हणजे गोव्यातील जनतेची निव्वळ थट्टाच आहे. लोक एकीकडे उपाशी असताना केंद्र सरकार मात्र राज्य सरकारला सोहळे साजरे करण्यासाठी पॅकेज देत आहे, असा टोलाही गिरीश चोडणकर यांनी लगावला.

पणजीः येत्या महिन्याभरात गुंडांना तडीपार करणार

त्याचबरोबर,  2012 मध्ये खाणबंदी झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे आर्थिक पॅकेज मागितले.  त्यावेळी भाजपाने काँग्रेस सरकारच्या या भूमिकेवर प्रचंड विरोध केला. मात्र  2014 मध्ये भाजपा सतेत आल्यासासून आत्तापर्यंत खाण पिडीतांसाठी राज्य सरकारने केंद्रातील भाजप सरकारकडून किती कोटींचं पॅकेज आणलं,  भाजपने गोव्यातील जनतेला स्पष्ट सांगावं, असे आव्हान चोडणकर यांनी दिले आहेत. 

संबंधित बातम्या