बघा कशी बनवतात गोव्यातील सुप्रसिद्ध 'फेणी'

बघा कशी बनवतात गोव्यातील सुप्रसिद्ध 'फेणी'
feni.jpg

फातोर्डा: गोव्यात वाईन व मद्य पेयांची अनेक प्रदर्शने व महोत्सव आयोजित केले जातात, पण फेणी हे गोव्याचे पारंपरिक पेय आहे, जे काजुपासून बनविले जाते. या पेयाचा प्रसार व्हावा यासाठी लोटली येथील ‘बिग फुट’मध्ये फेणी महोत्सवाचे आयोजन २००९ पासून ‘एनसेस्ट्रल गोवा’चे महेन्द्र आल्वारीस यांनी सुरू केले. (What is Feni and How to make Feni Drink)

बिग फुट हे गोव्याची परंपरा, संस्कृतीचे प्रदर्शन करणारे केंद्र आहे. या महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात. गोव्याच्या या पारंपरिक पेयाची माहिती लोकांना, पर्यटकांना मिळावी म्हणून एक माहिती पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये फेणी कशी बनवली जाते, फेणी बनविण्याची गोव्यातील केंद्रांची माहिती, उपयोग व इतर बरीच माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.

यंदा फेणी महोत्सवाचे (Feni Festival) उद्‍घाटन दिमाखात करण्यात आले. फेणी कशी बनवितात याचे प्रात्यक्षिकसुद्धा दाखविण्यात आले. काजू (Kashew) किंवा नारळाचा (Coconut) रस कसा व कुठल्या भांड्यांत गोळा केला जातो, ती भांडीसुद्धा प्रदर्शनार्थ ठेवण्यात आली आहेत. यात  दुडकें, दामोनें, काती यांचा समावेश आहे. या महोत्सवाला अनेक आमंत्रितांना बोलावण्यात आले. त्यांना वेगवेगळ्या फेणीचे प्रकार देण्यात आले. शिवाय लोकांना आंब्याचे (आमली) लोणची, सुक्या कोळंबीचे वेगवेगळे जिन्नस, खाण्यास देण्यात आले. नारळाच्या झाडापासून बनविलेल्या अनेक वस्तू प्रदर्शनार्थ ठेवण्यात आल्या आहेत. हा केवळ फेणी महोत्सव नसून एक बोधप्रद व शिक्षणात्मक असा महोत्सव असल्याचे महेन्द्र आल्वारीस यांनी सांगितले. फेणीला आता विदेशातही मागणी येत आहे. या पेयाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्याचेही आल्वारीस यांनी सांगितले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com