काय आहे गोव्याच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यातील वादाचे कारण ?

What is the reason for the dispute between the Chief Minister and the Health Minister
What is the reason for the dispute between the Chief Minister and the Health Minister

पणजी:  मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री (Minister of Health) विश्वजित राणे यांच्यामध्ये रुपये २२ कोटी ५० लाख रुपयांच्या आयव्हरमेक्टिन गोळ्या (Ivermectin tablets)खरेदीतील कथित कमिशन वाटणीत झालेल्या वादानेच गोवा वैद्यकिय महाविद्यालय (Medical college) इस्पितळातील कोविड रुग्णांचा (Covid patients) बळी घेतला, असा सणसणीत आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. या दोघांतील वाद सार्वजनिक झाल्यानंतर ही टिप्पणी करण्याची संधी चोडणकर यांनी सोडली नाही.(What is the reason for the dispute between the Chief Minister and the Health Minister)

गोव्यातील 18 वर्षे वयावरील सर्वांना कोविडची बाधा होऊ नये, यासाठी प्रोफिलेक्सीस उपचार म्हणून आयव्हरमेक्टिन गोळ्या देण्याचे सरकारने दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांच्या एकमतानेच सदर गोळ्यांची ऑर्डर आरोग्यखात्याने जारी केली होती. परंतु सदर ऑर्डरवरील रकमेची ६० टक्के कमिशनची रक्कम वाटून घेण्यावरून मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यात वाद सुरू झाला व त्याच परिणाम दोघानीही एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला व निष्पाप रुग्णांचे प्राण गेले, असे चोडणकर यांचे म्हणणे आहे. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना धडा शिकविण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा आपल्या हाताखाली घेतला. त्यामुळे संतापलेल्या आरोग्यमंत्र्यानी ऑक्सिजन पुरवठादारकांना धमकावण्यास सुरवात केली. या वादाचा गंभीर परिणाम रुग्णांच्या प्राणावर बेतला, असे चोडणकर यांनी म्हटले आहे. सदर आयव्हरमेक्टिन गोळ्यांचे १२ मिलीग्रॅमच्या दहा गोळ्या असलेली स्ट्रिप बाजारात सरासरी ३७० रुपयांना मिळते. या दराने गणित केल्यास एका गोळीची किंमत साधारण ३० रुपये होते. गोव्याची लोकसंख्या १५ लाख जमेस धरल्यास प्रती व्यक्ती पाच गोळ्या या प्रमाणे ७५ लाख गोळ्यांची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे एकंदर ऑर्डर ही साधारण  २२ कोटी ५० लाख रुपयांची  आहे, असे चोडणकर यांनी स्पष्ट केले.

गोमेकॉतील निष्पाप कोविड रुग्णांची हत्त्या गोव्यातील भाजप सरकारने ऑक्सिजन पुरवठा बंद करून केल्याचे आता उघड झाले आहे. घटनेच्या कलम २१ चा हा भंग असून, भाजप सरकारने घटनेचाच गळा दाबला आहे. सरकारला या क्रूर कृत्याबद्दल न्यायपालिकेला जाब द्याव्याच लागेल असे त्यांनी नमूद केले. जागतिक आरोग्य संघटनेने सदर आयव्हरमेक्टिन गोळ्यांच्या सेवनासाठी रुग्णांची योग्य चिकीत्सा करून घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत हे मी कालच सरकारच्या निदर्शनास आणले होते व सदर उपचार पद्धती राबविण्यासाठी वैज्ञानिक आधार आहे का? हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी केली होती. परंतु, मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी अजूनही त्यावर शब्द काढलेला नाही. यावरुनच सदर गोळ्यांच्या खरेदीत घोटाळा असल्याचे उघड होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com