Yaas:चक्रीवादळाचा गोव्याच्या मान्सूनवर काय परिणाम होणार ?

Yaas:चक्रीवादळाचा गोव्याच्या मान्सूनवर काय परिणाम होणार ?
Cyclone yaas.jpg

नवी दिल्ली: बंगालच्या उपसागरात (Bay of BengaL) निर्माण झालेल्या ‘यास’ या चक्रीवादळामुळे (Cyclone Yaas) पश्चिम किनारपट्टीवर प्रतिकूल परिणाम जाणविणार नाही व मॉन्सूनच्या प्रगतीतही त्यामुळे बाधा येण्याची शक्यता नाही, असा दिलासा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. (What will be the effect of cyclone on Goa's monsoon?)

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, यास वादळ उद्या (26) ओडिशा किनारपट्टीला धडकणार आहे. यामुळे ओडिशा, बंगालपासून झारखंडपर्यंत वेगवान वारे व मुसळधार पाऊस सुरू आहे. ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागांत ‘यास’च्या प्रभावामुळे ताशी 160 किमी वेगाने वारे वाहतील. मात्र या वादळाचा पश्चिम किनारपट्टीवर याचा प्रतिकूल प्रभाव पडण्याची शक्यता नाही. केरळमध्ये मॉन्सून ठरलेल्या 1 जून पर्यंत दाखल होईल.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) पूर्व मध्य भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे "तीव्र चक्रीवादळ वादळ" येणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याच्या मेटरॉलिजिकल लॉजीकल विभागाने  (India Meteorological Department) काही दिवसांपूर्वीच दिली होती. त्यानुसार 'यास' नामक वादळ आता पुढच्या काही तासांत किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. किनारी भागांमध्ये या वादळाचे परिणाम दिसायला  सुरुवात झाली असुन, अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असल्याची माहिती मिळते आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिसा राज्यांना या वादळाचा मोठा फटका बसणार असून, या वादळाचे परिणाम हे अम्फान वादळापेक्षा मोठे असू शकतात. त्या अनुशंघाने सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com