विघ्नहर्ता अनुष्ठान

विघ्नहर्ता अनुष्ठान
विघ्नहर्ता अनुष्ठान

आता भरीभार विघ्नहर्त्यावर...
जेव्हा प्रयत्न संपतात, तेव्हा उपाय "प्रार्थना"

मनुष्याला सुख, समाधान, शांती, यश, उत्तम आरोग्य, लक्ष्मी प्राप्ती, विद्या प्राप्ती, मनोकामनापूर्ती, दीर्घायुष्य प्राप्ती तथा कल्याणकारी जीवनासाठी तपश्चर्या करणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या धार्मिक विधी, अनुष्ठान, यज्ञयाग यांच्या माध्यमातून आपल्याला सात्विक लहरी प्राप्त होत असतात आणि माणूस सकारात्मक भूमिकेमध्ये आपले जीवन जगू शकतो. याचे ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर ऋषिमुनींनी उभं करुन दिलेलं आहे. चैत्र मास अर्थातच गुढीपाडव्यापासून ते फाल्गुन मास म्हणजे होलिका पौर्णिमेपर्यंत अनेक सण-उत्सव सांगितलेले आहेत. हे सगळे सण उत्सव साजरे करत असताना या मागचा उद्देश तरी काय असेल? तर आपल्या सर्वांची मनोभूमिका, शुद्ध सात्विक विचारांनी मंडित व्हावी हाच मुख्य उद्देश आहे. आज विश्वभर कोरोना महामारीसारखा विषाणू सर्वत्र थैमान घालत आहे तर हे सर्व आपण पाहत असताना आपली जीवनचर्या ही कशा पद्धतीने असावी याचा विचार आपण मनुष्याने करणे गरजेचं आहे.  आपल्या जीवनात यशस्वी वाटचाल करायची असेल तर त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक होणं क्रमप्राप्त आहे. आपण सर्वजण भाग्यवंत आहोत, कारण आज आपल्याला  ऋषिमुनींनी घालून दिलेली वैदिक सनातन हिंदू धर्माची परंपरा आचरणातून सिद्ध करण्याची संधी प्राप्त होत आहे. हजारो वर्षांपासून असलेली सद्गुरुंची अखंडित दिव्य सद्गुरु परंपरा आपल्याला वैदिक सनातन हिंदू धर्माच अमौलिक ज्ञान प्रदान करते आहे. आज फक्त गरज आहे की या ज्ञानगंगोत्रीमध्ये आपण सर्वांनी अघमर्षण करण्याची. गोव्याचा तसा खूप मोठा प्राचीनकालीन  वारसा असून ज्याचा इतिहास पुराणांमध्ये आहे. थोडं आपण मागच्या दिशेने वळून पाहिलं, पुराणांमध्ये अभ्यास केला तर नक्कीच आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्माचे खरेखरे चित्र दिसू शकेल आणि यासाठी श्री दत्त पद्मनाभ पीठ क्रांतिकारी कार्य करीत आहे. सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामीजी, सद्गुरु सुशेणाचार्य स्वामीजी, सद्गुरु सदानंदाचार्य स्वामीजी, सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी, विद्यमान पीठाधीश्वर सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे पावन अधिष्ठान आपल्याला प्राप्त आहे. आपण सर्वजण खरोखरच भाग्यवंत आहोत. कारण अशी ही पूज्य सद्गुरुंची अखंडित दिव्य परंपरा आपल्या जीवनात आम्हाला प्राप्त झाली. सद्गुरुंचे ज्ञान, धर्माचे ज्ञान आम्हा सर्वांना प्राप्त झाले. हिंदू धर्माचा स्वाभिमान आज आपल्या अंगाखांद्यावर उभा आहे. त्यामुळे आपण सर्वजण ही आचरण पद्धती शिकणं आणि ती आचरणातून जगणं तितकेच महत्त्वाचा आहे.  . आज प्रत्येकाच्या मुखावर वेद, शास्त्र, पुराण, संस्कृत, पौरोहित्य आहे. याचं कारण एवढच कारण सद्गुरूंनी जे आपल्याला ज्ञान प्रदान केलं त्या ज्ञानामध्ये आपण सर्वांनी अघमर्षण केलं आणि आज त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये आम्हा सर्वांना होतो आहे. सांगायचं तात्पर्य असं की पूज्य सद्गुरु हे सर्व आम्हा सर्वांच्या कल्याणासाठीच करीत आहेत. हीच मनिषा, संकल्पना आपल्या मानसिकतेमध्ये असली तर नक्कीच आपण सर्वजण यशस्वी जीवन जगू शकतो आणि त्यासाठी आपण या सर्व विद्यांचे ज्ञान प्राप्त करणं महत्वाचे आहे. देव देश आणि धर्माचे कार्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी फक्त आपल्या गोमंतकापुरतेच अन्  भारत देशापुरतेच मर्यादित न ठेवता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर हे कार्य पोहोचवलं आहे. वैदिक गुरुकुल पद्धतीच्या शिक्षण व्यवस्थेबरोबरच महिलांनाही संस्कृत, वेद, पौरोहित्य असे ज्ञान प्राप्त करण्याची व्यवस्था लावून दिली काय किमया असेल पूज्य सद्गुरुंची. त्यामुळे आज गोमंतकातला प्रत्येक माणूस, प्रत्येक हिंदू स्वतः अभिमानाने सांगतो आहे की मी हिंदू आहे, कारण माझ्या अंगावर जानव आहे, माझ्या कपाळावर कुंकुम तिलक आहे, डोक्यावर शेंडी, माझ्या मुखामध्ये गायत्री उपासना, पौरोहित्य, संस्कृत आहे हे आपण सर्वजण का बरं सांगू शकतो कारण पूज्य सद्गुरूंनी आपल्या जीवनामध्ये असे चमत्कार घडवले. आज मनुष्य प्रत्येक क्षणा-क्षणाला यशस्वी होत चालला आहे. आज आपण बघतो आहोत ही कोरोना महामारी सर्वत्र पसरलेली आहे. सर्व व्यवस्था ठप्प झालेल्या आहेत. मनुष्य अक्षरशः हतबल झालेला आहे. काय करावं, कसं करावं, ही महामारी कशी थांबणार? असे वेगवेगळे प्रश्न सर्वांसमोर उभे राहिलेले आहेत. अशावेळी एकच पर्याय आहे ती म्हणजे प्रार्थना. मागील पाच-सहा महिन्यांपासून आपण या महामारीतून पुढे जातो आहोत. कधीतरी ही महामारी बंद होणार? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच अनुशंगाने जगत् जननीद्वारा ऑनलाईन माध्यमातून विघ्नहर्ता अनुष्ठान आयोजित करण्यात आले आहे. करुणामयी मातृशक्ती द्वारे विघ्नहर्त्याला कळकळीचे सांकडे हजारोंच्या संख्येने यजमान ऑनलाईन माध्यमातून एकत्रित येऊन हे अनुष्ठान श्री क्षेत्र तपोभूमीवर संपन्न करीत आहेत. कोरोना महामारी दूर करण्यासाठी अनेकांचे अनेक प्रयत्न सुरु आहेत. प्रशासन, डॉक्टर, पोलिस, इतर संस्था किंवा आपण स्वतः असू दे सर्वांसमोर प्रश्न उभा राहिला आहे की  यासाठी पर्याय काय ? तर उत्तर एकच आहे. आता भरीभार विघ्नहर्त्यावर... जेव्हा प्रयत्न संपतात, तेव्हा उपाय "प्रार्थना" असते हा पूज्य सद्गुरुंचा बोध घेऊन आपण सर्वांनी विघ्नहर्ता श्री महागणपतीला विनवणी करुया. कोरोना महामारीच्या काळामध्ये मनःशांती, यशप्राप्ती, उत्तम आरोग्य, लक्ष्मीप्राप्ती, विद्या प्राप्ती, मनोकामनापूर्ती, दीर्घायुष्य तथा सर्वांच्या कल्याणार्थ श्री विघ्नहर्ता गणरायाचरणी ऑनलाइन पद्धतीने सर्वजण एकत्रित येऊन धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या पावन आशीर्वादाने विघ्नहर्ता अनुष्ठान संपन्न करणार आहेत. आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की या अनुष्ठानामध्ये भारत, दुबई, जर्मनी, अमेरिका, कॅनडा, लंडन, अशा वेगवेगळ्या देशांमधून गणेश भक्त अनुष्ठानात सहभागी होत आहेत. तर चला, आम्ही सर्वजण विघ्नहर्ता श्रीगणराया चरणी आर्ततेने प्रार्थना करुया. श्री गणेश चतुर्थी उत्सवाप्रीत्यर्थ श्री विघ्नहर्ता गणरायांच्याचरणी कोटी कोटी वंदन, समस्त गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com