गोव्यातील पाणी पुरवठा विभागाचे लक्ष कुठेय?

गोव्यातील पाणी पुरवठा विभागाचे लक्ष कुठेय?
Goa Water Supply Department

पेडणे: विर्नोडा येथे गेले चार दिवस जलवाहिनी फुटून( pipeline rupture) रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी(water) वाहात आहे. या पाण्याचे प्रमाण इतके आहे की दुचाकी वाहने पाण्यातून सावकाश न्यावी लागता आहे. एका बाजूने पेडणे तालुक्यात पाण्याची टंचाई आहे. पाण्यासाठी लोकांचे हाल  होत आहेत, तर दुसऱ्या बाजूने अशाप्रकारे जलवाहिनी फुटून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ही जलवाहिनी फुटून चार दिवस झाले, तरी संबंधित खात्याचे अद्याप याकडे लक्ष गेलेले नाही, याबद्दल नागरिकांत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. गोव्यात पाणी पुरवठा सार्वजनिक बांधकाम खाते करते. त्यासाठी खात्यात आरोग्य अभियांत्रिकी विभाग आहे. गोव्यात पालिका क्षेत्रातही सरकारच पाणी पुरवते. पण या फुटलेल्या पाइपलाइन कडे संबधइत खात्याचे लक्षच नाही. (Where is Goa Water Supply Department)

त्याचबोरबर डिचोली पालिका क्षेत्रातील मांद्रेकरवाडा येथे डिचोली-सारमानस रस्त्या नजीक असलेल्या जलवाहिनीचा व्हॉल्व मोडल्याने पाण्याची प्रचंड प्रमाणात नासाडी सुरु आहे. जलवाहिनीतून घसघसून पाणी वाहत असून,  एखादा ओहोळ वहावा. तसे चित्र यातून दिसून येत आहे. आमचे डिचोलीचे प्रतिनिधी तुकाराम सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फुटलेल्या जलवाहिनीतून सकाळी दहा वाजेपर्यंत पाणी खळखळून बाहेर वाहत होते. वाहनाच्या धडकेत व्हॉल्व मोडल्याने ही समस्या निर्माण झाली. परिणामी  मांद्रेकरवाडा, बाराजणनगर तसेच पिळगाव पंचायत क्षेत्रातील काही भागातील पाणी पूरवठ्यावर परिणाम झाला होता. 

दरम्यान तोंक्ते वादळाचा फटका वसल्याने तेथिल नागरीकांचे पाण्याचे हाल झाले होते. तळ्यात थेट समुद्राचे पाणी शिरल्याने गोड्या पाण्यातील मासळी मृत पावली होती. खारेपाणी पिल्याने व स्वयंपाकासाठी वापरल्याने आरोग्यावर त्यांचा अनिष्ट परिणाम तर होणार का या विचाराने नागरिक चिंतेत होते. मंध्यंतरी पर्वरी आणि साळगाव मतदारसंघात पाच दिवस पाण्याचा एकही थेंब न आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. पर्वरी येथील पाणीपुरवठा विभाग 17 वर ग्रामस्थांनी धडक मोर्चाही नेला होता. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com