६१ धरणात पाणी ‘सरकार’ कोठून आणणार : फळदेसाई

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

मुख्यमंत्री प्रमोद सावंत ६१ धरणांचा विषय घेऊन येत्या निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, गोव्यातील जनता दुधखूळी नाही, असे मत गोवा सुरक्षा मंचचे युवा अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी व्यक्त केले.

मुरगाव :  मुख्यमंत्री प्रमोद सावंत ६१ धरणांचा विषय घेऊन येत्या निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, गोव्यातील जनता दुधखूळी नाही, असे मत गोवा सुरक्षा मंचचे युवा अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी व्यक्त केले. गोव्याला तोंडघशी पाडून आता ६१ धरणे बांधणार आहेत, पण त्या धरणाला पाणी कुठून आणणार, ते मात्र सांगायला ते सोयीस्कररित्या विसरलेले दिसतात. म्हादई प्रकरणात सरकारने केवळ दिखाऊपणा केला. प्रत्यक्षात मात्र काही साध्य झाले नाही.

न्यायप्रविष्ट प्रकरण असतानाही कर्नाटक सरकारने गोवा सरकारच्या नाकावर टिच्चून बांधकाम केले, पाणी वळवले, तेव्हा मुख्यमंत्र्यांची दातखिळी बसली होती, असा आरोपही नितीन फळदेसाई यांनी केला. केंद्रात, कर्नाटकात आणि गोव्यात भाजपाचे सरकार आणि हे आक्षेप घेतात. त्याआक्षेपातून काहीतरी निष्पन्न व्हायला हवे, पण कुठचे काय? गोमंतकीय जनतेला दुधखुळी समजू नका, बडे बडे म्हणून मिरवणाऱ्या नेत्यान जनतेने घरी बसवले आहे, हे मुख्यमंत्री सावंत यांनी विसरू नये, असा सल्ला ही फळदेसाई यांनी दिली. गेल्या निवडणुकीत आपणाला जनतेने नाकारले होते, यांची आठवणही यावेळी करून देण्यात आली.
 

संबंधित बातम्या