मुरगाव: लोहखनिज भरताना मुरगाव बंदरावर बार्ज बुडाली

दैनिक गोमंतक
मंगळवार, 6 एप्रिल 2021

मुरगाव बंदरामध्ये उभ्या असलेल्या बोटीत लोहखनिज भरताना काल रात्री साडे दहाच्या दरम्यान एम व्ही सूर्या नावाची बार्ज बुडाली.

मुरगाव: मुरगाव बंदरामध्ये उभ्या असलेल्या बोटीत लोहखनिज भरताना काल रात्री साडे दहाच्या दरम्यान एम व्ही सूर्या नावाची बार्ज बुडाली. (While filling iron ore, a barge named Surya sank at Morgaon port)

मडगाव अपडेट: कुरवपूर वारी पुढे ढकलली

काल मुरगाव बंदरावर ही घटना घडली. गोवा (Goa) बार्ज मालक संघटनेचे अध्यक्ष अतुल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार या बार्जवर आठ कर्मचारी कार्यरत होते. त्यापैकी एका कर्मचाऱ्याला अत्यवस्थ स्थितीत चिखली (Chikhali) येथील उपजिल्हा इस्पितळात हलवण्यात आले, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. या बार्जचा पूर्ण विमा उतरवण्यात आलेला होता आणि त्यामुळे ती पाण्याबाहेर काढण्याचे काम लगेच हाती घेण्यात आलेले आहे. या बार्जमध्ये (Barge) 1700 टन लोह खनिज होते त्यापैकी काही खनिज बोटीत क्रेन द्वारे चढवण्यात आल्यानंतर ही दुर्घटना घडली.

संबंधित बातम्या