'गोव्यातील तरुण बेरोजगार, भाजप सेलिब्रेशन मोडमध्ये'

आपकडून गोव्यातील बेरोजगरीचा प्रश्न उचलून धरला जात आहे
'गोव्यातील तरुण बेरोजगार, भाजप सेलिब्रेशन मोडमध्ये'
Goa AAP BJP Dainik Gomantak

गोव्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजले आहे. यातच राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी राज्यातील नेतृत्व निकराने प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपचा पराभव करण्यासाठी तृणमुलसह इतर राजकीय पक्षांनी मोट बांधली आहे. यात आपने देखील चांगलाच सहभाग घेतला आहे. आपकडून गोव्यातील बेरोजगरीचा प्रश्न उचलून धरला जात आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना आपकडून भाजपवर निशाणा साधला आहे. गोव्यातील तरुण बेरोजगार आहेत, आणि भाजप (BJP) सेलिब्रेशन मोडमध्ये आहे अशी टीका आप (AAP) नेते सिद्धेश भगत यांनी केली आहे.

Goa AAP BJP
सूरज लोटलीकर यांच्यावर बीसीसीआयची महत्त्वाची जबाबदारी

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी 21 डिसेंबर रोजी गोव्यातील तरुणांना नोकरी मिळेपर्यंत त्यांना दरमहा 3000 रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे. पणजीत एका प्रचारसभेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, "दिल्लीत लोकांना मोफत आणि 24 तास वीज मिळते. तुम्ही दिल्लीतील तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना विचारा आणि त्यांनी नाकारले तर मला मत देऊ नका. आम्ही तरुणांना नोकऱ्या देऊ आणि जोपर्यंत त्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना दरमहा 3000 रुपये बेरोजगारी भत्ता देऊ."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com