Bodgeshwar Jatra: बोडगेश्वर जत्रेतील कचऱ्याला जबाबदार कोण?

जत्रा भरते त्या जागेवर अक्षरशः कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून वाऱ्यामुळे हा कचरा इतरत्र पसरत असल्याचे चित्र दिसत आहे.
The Garbage
The GarbageDainik Gomantak

म्हापसा येथील प्रसिद्ध श्री देव बोडगेश्वर संस्थानचा जत्रोत्सव नुकताच पार पडला. जत्रा आणि वर्धापन सोहळ्यासाठीचे आयोजन नियोजनबद्ध व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी स्थानिक आमदारांनी देवस्थान समिती, पालिका व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीत जत्रोत्सवानंतर निर्मळ होणाऱ्या कचऱ्याबाबत कोणते नियम लावावेत या मुद्द्यावर सर्वांनीच पुढाकार घेतला होता.

The Garbage
The GarbageDainik Gomantak

मात्र आता जत्रोत्सव झाल्यावर ज्या ठिकाणी जत्रा भरते त्या जागेवर अक्षरशः कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून वाऱ्यामुळे हा कचरा इतरत्र पसरत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच शिळे अन्न, कुजकी फळे खाण्यासाठी भटकी गुरे, कुत्री या परिसरात फिरत आहेत. सदरचा परिसर गलिच्छ बनत चालला असून परिसरातील लोकांना याचा त्रास होऊ लागला आहे.

The Garbage
The GarbageDainik Gomantak

या प्रकरणी समिती सचिव अ‍ॅड. वामन पंडित यांनी प्रत्येक दुकानांकडून 5 हजार रुपये शुल्क हे कचरा ठेव म्हणून घेतले जाणार असल्याचे सांगितले होते. 'जत्रेनंतर काहीजण कचरा टाकून जातात, नंतर समिती तो हटवते', असेही अ‍ॅड पंडित म्हणाले होते, मात्र अद्याप त्यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाहीय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com