गौरव आर्याच्‍या भागीदारीत कर्नाटकाचा आमदार?

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

अमली पदार्थ नियंत्रण विभागाने सुरू केलेल्‍या चौकशीत गौरव आर्या याचे नाव पुढे आले. त्‍यानंतर त्‍याच्‍या व्‍यवसायात कर्नाटकातील एक आमदार व पाटील नामक अन्‍य एक भागीदार असल्‍याचे उघड झाले. 

पणजी: अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्‍यूप्रकरणात हणजूणे येथील एका रिसॉर्टमालकाचे नाव उघड झाल्‍यानंतर राजकीय नेते व ड्रग्‍ज व्‍यावसायिकांची नावे चर्चेत आली आहेत. अमली पदार्थ नियंत्रण विभागाने सुरू केलेल्‍या चौकशीत गौरव आर्या याचे नाव पुढे आले. त्‍यानंतर त्‍याच्‍या व्‍यवसायात कर्नाटकातील एक आमदार व पाटील नामक अन्‍य एक भागीदार असल्‍याचे उघड झाले. 

तसेच आर्या याचे दुबईतही काही प्रकल्‍प आहेत. कर्नाटकातील ‘ती’ व्‍यक्ती हॉटेलमध्‍ये सहभागीदार असल्‍याचे ईडीच्‍या चौकशीत उघड झाले. त्‍यामुळे एनसीबी, ईडी यांच्‍या चौकशीच्‍या घेऱ्यात ते तिघेजण अडकले आहेत. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या