कच्चा कैदी रामचंद्र यल्लाप्पाचे स्वयंपाकखोलीत स्‍थलांतर कोणी केले?

प्रतिनिधी
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

कच्चा कैदी रामचंद्र यल्लाप्पा याला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय किंवा कोणतीही माहिती न देता रविवारी (२० सप्टेंबर) त्याला कैद्यांच्या कक्षातून स्वयंपाक खोलीत कामासाठी स्थलांतर करण्यात आले होते.

पणजी:  कच्चा कैदी रामचंद्र यल्लाप्पा याला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय किंवा कोणतीही माहिती न देता रविवारी (२० सप्टेंबर) त्याला कैद्यांच्या कक्षातून स्वयंपाक खोलीत कामासाठी स्थलांतर करण्यात आले होते. त्याचे हे स्थलांतर कोणी व कोणाच्या आदेशाने केले गेले याची उत्तरे कारागृहातील सहाय्यक तुरुंग अधीक्षक देऊ शकलेला नाही. यासंदर्भात आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगून हात वर केले आहेत. यल्लाप्पा हा अट्टल गुन्हेगार असल्याने त्याने कारागृहातील सर्व प्रवेशद्वारांची तसेच कोठून पलायन करता येईल, याची पूर्ण माहिती मिळवून नियोजनबद्ध तयारी केली होती, असा अंदाज चौकशी अधिकाऱ्यांनी काढला आहे.

...अशीही शक्‍यता?
कारागृहातून कैदी यल्लाप्पा कोणत्या मार्गाने पळाला याची चौकशी केली असता तो कारागृहाच्या संरक्षक भिंतीवरून पलायन करू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. घटनेच्या दिवशी सकाळच्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. त्याचा फायदा उठवून त्याने आतील संरक्षक भिंतीवरून चढला व त्यानंतर दोन संरक्षक भिंतीमध्ये असलेल्या जागेतून तो आयआरबी पोलिस असलेल्या प्रवेशद्वाराकडे गेला. सकाळी साडेसहाच्या सुमारास पंप सुरू करण्यास पोलिस प्रवेशद्वार खुले करून बाहेर जातो, त्याचा फायदा उठवून तो तेथून पसार झाल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. कारागृहातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याने कैदी यल्लाप्पा नेमका कोणत्या प्रवेशद्वारातून गेला असावा याचाही अंदाज लावणे अशक्य झाले आहे. 
 

संबंधित बातम्या