गोव्यातील रेल्वेमार्ग दुपदरीकरणाबाबत आमदार आल्मेदांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

 रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचा लाभ कोणाला होणार आहे? असा प्रश्न वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा मुख्यमंत्र्यांना केला आहे. सरकारने या कामाबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केली आहे.

वास्को : रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचा लाभ कोणाला होणार आहे? असा प्रश्न वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा मुख्यमंत्र्यांना केला आहे. सरकारने या कामाबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केली आहे. रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला माझा विरोध नाही. मात्र त्यापूर्वी त्याचा लाभ कसा व कोणाला होईल, हे समाजाला कळले पाहिजे, असे मत त्यांनी स्पष्ट  केले.

 

रेल्वेमार्ग दुपदरीकरण झाल्यानंतर गोव्यात किती ट्रेन धावतील? कोणत्या ट्रेन धावतील? त्यांचा लाभ कोणास होणार आहे याची माहिती देण्याची विनंती करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. त्यासंबंधी त्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त काली आहे. पूर्वी मीटरगेज होते, त्यानंतर ब्रॉडगेज रेल्वेमार्ग करण्यात आला. दुपदरीकरणानंतर त्रिपदरीकरण, चौपदरीकरण; असेच रेल्वेमार्ग होतील मग जनतेने काय करावे, असा सवाल आमदार आल्मेदा यांनी उपस्थित केला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनाही त्यांनी असे प्रश्न विचारले होते.

वास्कोत रेल्वेमार्ग दुपदरीकरण करण्यापूर्वी काही प्रश्नांची उत्तरे  स्थानिक वास्कोवासीयांना मिळाली पाहिजेत. असे  भाष्य आमदार आल्मेदा यांनी केले आहे.

दक्षिण पश्चिम रेल्वेच्या सरव्यवस्थापकांनी आपल्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला होता. त्यांनी दुपदरीकरणाला हरकत आहे काय, असे विचारले होते. दुपदरीकरणाचा लाभ कोणाला व कसा होणार आहे याची माहिती देण्याची मागणी आपण त्यांच्याकडे केली आहे.
कार्लुस आल्मेदा, आमदार, वास्को

संबंधित बातम्या