घाऊक मासळी मार्केट म्हणजे 'माडेल' साठी शाप; सत्तेत आल्यास मार्केट बंद करणार 

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 30 मार्च 2021

आम्ही सत्तेत आल्यास हे मार्केट बंद करून त्या जागी आयटी केंद्र सुरु करण्यात येणार असून या केंद्रात स्थानिकांना रोजगार मिळू शकेल.

मडगाव : एसजीपीडीएचे घाऊक मासळी मार्केट हे माडेलसाठी एक शाप बनले आहे. हे मार्केट म्हणजे दुर्गंधी, खंडणी व गैरप्रकार सोडून दुसरे काहीच नसून आमचे सरकार आल्यास हे मार्केट बंद करण्यात येणार आहे, असे गोवा फा्ररवर्ड पक्षाचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी माडेल येथे जाहीर केले. माडेल व मुंगुल येथील अंतर्गत रस्त्यांच्या हाॅटमिक्स डांबरीकरणाच्या कामाचे सरदेसाई यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 

गोवा विधानसभा: ''कोळसा खाणीच्या संदर्भात विधानसभेत चर्चा झालीच पाहिजे...

पालिका निवडणूक प्रचारासाठी घरोघरी भेट देताना या मार्केटबद्दल तक्रारी एेकू येत आहेत. हे मार्केट म्हणजे स्थानिकांसाठी केवळ दुर्गंधी, खंडणी व भ्राष्टाचाराचे आरोप वगळता अन्य काही नाही. स्थानिकांना या मार्केटचा काहीच लाभ नाही. येथे कोण काय करतात, पैसे कोण कमवतात हे कोणालाच कळत नाही. अवघे काहीजणच या मार्केटमध्ये खंडणीवर जगत आहेत, असे सरदेसाई यांनी सांगितले. (The wholesale fish market is a curse for the model If he comes to power he will close the market)

आम्ही सत्तेत आल्यास हे मार्केट बंद करून त्या जागी आयटी केंद्र सुरु करण्यात येणार असून या केंद्रात स्थानिकांना रोजगार मिळू शकेल. हे मार्केट जेटी असलेल्या बेतुल सारख्या ठिकाणी हलवता येईल, असे त्यांनी vVसांगितले. 

संबंधित बातम्या