गोव्यात का मिळते दारू स्वस्त; जाणून घ्या

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

30 मे 1987 ला गोव्याला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला.

गोव्यात इतर राज्यांच्या तुलनेत दारू स्वस्त मिळते. इतकी स्वस्त की फक्त 40 रुपयाला बीअर (Beer) मिळते, तसेच 400 रुपयाला संपूर्ण बाॅटल मिळते. याच कारण काय? भारताला 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. मात्र तेव्हा गोवा स्वतंत्र झालेला नव्हता. गोव्यावरती पोर्तुगीजांची सत्ता होती. त्यानंतर,  गोवा (Goa) मुक्ती संग्रामच्या लढ्यांनंतर अखेर 1961 साली गोवा भारताचा भाग झाला. गोव्यातून पोर्तुगीजांची हकालपट्टी केली. परंतू, मागे सोडून गेले ते सुंदर शहर 'ओल्ड गोवा'. पोर्तुगीजांनी चारशे वर्ष गोव्यावर राज्य केले. पोर्तुगीजांनी त्यांच्या देशात बनवलेली वाईन भारतात विकण्यास सुरुरवात केली. आणि त्यानंतर ती वाईन गोव्याच्या संस्कृतीत रुजली ती कायमचीच. वाईन सोबत पोर्तुगीजांनी गोव्यातील खाद्य संस्कृतीदेखील बदलली. (Why is alcohol cheaper in Goa? )

गोव्यात दारू स्वस्त का? 
30 मे 1987 ला गोव्याला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. गोवा राज्य अतिशय लहान राज्य त्यामुळे राज्य चालवण्यासाठी महसूल लागणार तो कसा मिळणार. मग गोव्यातील लोकांनी रणनिती आखली आणि आपल्या संस्कृतीचे मार्केटिंग सुरु केले. त्यामुळे गोव्याकडे पर्यटकांचा ओढा आपसूकच वाढला. त्यामुळे दारूची मागची वाढली. दारूची वाढलेली मागलेली लक्षात घेता गोवा सरकारने दारूच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने दारूवरील अतिरिक्त कर कमी केल्यामुळे दारूची किंमत आपोआप कमी झाली. गोव्यात दारूवर बाकी राज्यांपेक्षा कर कमी आकारला जातो त्यामुळे दारूच्या दरात एवढा फरक दिसतो.    

भाजपवासी 10 आमदार अस्वस्थ; गोवा मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता 

गोव्यात फास्ट- फूड वरती जास्तीचा कर
गोवा सरकारने दारूच्या किंमती कमी ठेवल्या असल्या तरी फास्ट फूड वरती जास्तच कर आकारला आहे. गोव्यात इतर मनोरंजनाच्या गोष्टी महाग आहेत, त्यावर अधिकचा कर आकाराला जातो. जर तुम्हाला गोव्यात खाजगी वाहन घेऊन जायचे असेल तर तुम्हाला त्याचाही कर द्यावा लागतो. बाहेर जर तुम्हाला पिझ्झा 600 रुपयाला मिळत असेल तर गोव्यामध्ये तो पिझ्झा 750 रुपयाला मिळतो. दारू जरी स्वस्त मिळत असेल तरी बाकीच्या गोष्टींमधून गोवा सरकार महसूल गोळा करते. 

संबंधित बातम्या