नारळाची एवढी झाडं असुन सुद्धा गोव्यात नारळाचे भाव का वाढताय? जाणुन घ्या

coconut.jpg
coconut.jpg

पणजी: गोमंतकीयांच्‍या जेवणातील अविभाज्‍य घटक नारळाने (Coconut) सध्‍या चांगलाच भाव खाल्ला आहे. सर्वसाधारणपणे 25 रुपयांना मिळणारा नारळ पणजी (Panajim) महानगरपालिका बाजारपेठेत चक्क 55 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सध्‍या दुकाने बंद असल्‍याने ग्राहकही (Customer) तो चढ्या दराने खरेदी करताना दिसत आहेत. (Why are coconut prices rising in Goa despite having so many coconut trees?)

शेतकऱ्यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, महाशिवरात्रीवेळी फुटणाऱ्या नारळाची ‘पेंड’ काढल्‍यानंतर दुसरी आलेली ‘पेंड’ काढण्‍यास योग्‍य होणार तेव्‍हाच कोरोना महामारीचा फैलाव झाला सर्व व्‍यवहार ठप्‍प झाले. तसेच नारळ काढणारे ‘पाडेली’ मिळेनासे झाले. त्‍यानंतर तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसल्‍यानंतर बागायतींचे नुकसान झाले. मॉन्‍सूनपूर्व पाऊस पडल्‍याने नारळ झाडावरच राहिले आणि बाजारपेठेत नारळांची आवक घटली व दर वाढला. सध्‍या ग्राहक नारळाच्‍या शोधात असतात. एखाद्या दुकानावर नारळ दिसल्‍यावर ते आवर्जून खरेदी करतात. 

राजधानी पणजीत मोठा नारळ 55 रुपयांपर्यंत असला, तरी म्‍हापसा, पेडणे बाजारपेठेत तो 45 रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्‍ध असल्‍याचे दिसून येते. बांदा, दोडामार्ग परिसरातून नारळ विक्रीसाठी आणले जात असल्‍याने दराबाबत काही प्रमाणात लोकांना दिलासा मिळत आहे. सध्‍या नारळाचे उत्‍पादन व आवक घटल्‍याने दर वाढल्‍याचे बागायतदार व विक्रेत्‍यांकडून सांगितले जात आहे.

नारळ का महागला?
कोरोना संचारबंदी व राज्‍याच्‍या सीमा बंद झाल्‍यामुळे कर्नाटक, केरळ, सिंधुदुर्ग येथून आयात होणारा नारळ बंद झाला. त्‍यामुळे स्‍थानिक नारळांवरच लोकांची भिस्‍त राहिली. संचारबंदीच्‍या काळातही लोकांनी नारळांची बेगमी केली. तसेच हॉटेल व्‍यावसायिकांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखून नारळ खरेदी करून ठेवले. कॅटरिंग व्‍यावसायिकांना मात्र, फटका बसल्‍याने जेवणाच्‍या ऑडर्सनुसार नारळ खरेदी केले. मात्र, त्‍यांना दराबाबत नुकसान सोसावे लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com