Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak

Mahadayi Water Dispute: म्हादईविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यास शिक्षण खात्याची आडकाठी का?

गोवा फॉरवर्डचा मुख्यमंत्र्याना प्रश्न

Mahadayi Water Dispute म्हादई ही आपल्याला आईसमान असे म्हणणारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे असलेले शिक्षणखाते गोव्यातील विद्यार्थ्यांमध्ये म्हादई संदर्भात जागृती निर्माण करण्यास आडकाठी आणते.

शिक्षण खात्याला उद्याचे जे नागरीक होणार आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या प्रश्ना बद्दल जागृती झालेली नको का ? की म्हादई आता मुख्यमंत्री सावंत यांच्यासाठी सावत्र आई बनली आहे असा सवाल गोवा फॉरवर्डच्या पर्यावरण विभागाचे निमंत्रक विकास भगत यांनी केला आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या पर्यावरण विभागाने 1 मार्च रोजी मडगाव येथे म्हादई विषयावर आंतरशालेय वकृत्व स्पर्धा ठेवली असून या पार्श्वभुमीवर शिक्षण खात्याच्या बार्देस तालुक्याचे शिक्षण अधिकारी किरण चौलसकर यांनी बार्देश भागातील शिक्षकांना शिक्षक आणि विद्यार्थी यांनी म्हादई संदर्भातील कुठल्याही स्पर्धेत भाग घेऊ नये अशी सूचना पाठवली आहे.

Mahadayi Water Dispute
सरकारी मराठी शाळा टिकण्यासाठी पाल्यांना मराठी शाळेतच पाठवावे : आमदार प्रवीण आर्लेकर

या संदर्भात आज भगत यांनी मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिक्षण खात्यावर टीका करताना, आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक होणार आहेत. त्यांनाच त्यांच्या भविष्यात त्रासदायक ठरू शकते अशा विषयावर बोलण्यास शिक्षण खात्याला नको का? असा सवाल केला.

म्हादई विषयावर राजकारण नको असे जे मुख्यमंत्री म्हणतात त्यांचेच शिक्षण खाते अशा प्रकारे राजकारण करत आहे असा आरोप करून "गोव्यात म्हादईवर आंदोलन होऊ देणारच नाही", असा मुख्यमंत्र्यानी केंद्र सरकारला शब्द दिला आहे का? असा सवाल त्यांनी केला. ज्या शिक्षण अधिकाऱ्याने या सूचना जारी केल्या आहेत त्यांना ताबडतोब सेवेतून निलंबित करा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Mahadayi Water Dispute
Pink Force : ‘पिंक फोर्स’ सेवेची चाके अडखळली !

म्हादईवर आवाज काढणाऱ्यांचा आवाज मुख्यमंत्री बंद करू पाहतात. पण हे दमनतंत्र फार काळ टिकणार नाही. लोकांचा उद्रेक होईपर्यंत मुख्यमंत्र्यानी वाट पाहू नये. लोकांमध्ये उद्रेक निर्माण झाल्यास मुख्यमत्र्यांना घराबाहेर पाऊल टाकणे मुश्किल होईल असा इशारा भगत यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com