गोवा सरकार घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज का देऊ शकत नाही: वाल्मिकी नाईक

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

आपल्याबरोबरच्या चर्चेवेळी गोमंतकीय घरगुती वीज ग्राहकांना सरकार मोफत वीज का पुरवू शकत नाही, याचे उत्तर देण्याची तयारी वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी ठेवावी, असे आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी आज येथे पत्रकार परिषदेत नमूद केले.

पणजी: आपल्याबरोबरच्या चर्चेवेळी गोमंतकीय घरगुती वीज ग्राहकांना सरकार मोफत वीज का पुरवू शकत नाही, याचे उत्तर देण्याची तयारी वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी ठेवावी, असे आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी आज येथे पत्रकार परिषदेत नमूद केले. ते म्हणाले, ही एक दिलासा देणारी बाब आहे, की चर्चेपासून दूर पळण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर वीजमंत्री काब्राल यांनी एका सर्वसामान्य गोमंतकीयाशी चर्चा करण्याची हिम्मत दाखवली आहे.

ते म्हणाले, चर्चेचा निर्णय काब्राल यांचाच आहे. त्यांच्या या निर्णयावर त्यांचे पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. काब्राल यांनी चर्चेचे आव्हान स्वीकारणे म्हणजे आपली पत आणि प्रतिष्ठा वाचविण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे. काब्राल यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे दस्तऐवज किंवा निश्चित आकडे किंवा वास्तव दर्शवणारी कुठलीही माहिती वगैरे नसली तरीही स्वतःची पुढे होऊ शकणारी नामुष्की आणि इज्जतीचा होणारा बभ्रा रोखण्यासाठी त्यांना आता चर्चेत उतरणे नाईलाजाने मान्य करावे लागले आहे.

अन्य एका पत्रकार परिषदेत पक्षाचे राज्य संयोजक राहूल म्हांबरे यांनी काजू लिलावावरून सरकारवर टीका केली. मात्र सरकारने कालच लिलाव प्रक्रियेत बदल केला जाणार नसल्याचा खुलासा केला आहे.

संबंधित बातम्या