सरकारी तिजोरी रिकामी का?

सरकारी तिजोरीत पैशांअभावी खडखडाट का? असा सवाल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना केला आहे.
सरकारी तिजोरी रिकामी का?
goa government treasury emptyDainik gomantak

फातोर्डा : ‘मी मुख्यमंत्री असताना सरकारी तिजोरी नेहमी भरलेली असायची, गोव्याची(Goa) भरभराट होत होती. मात्र, गेल्या दहा वर्षांत गोमंतकीय आर्थिकदृष्ट्या असा हतबल का झाला? सरकारी तिजोरीत पैशांअभावी खडखडाट का? असा सवाल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod sawant) यांना केला आहे.

कुडतरी येथे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या वाढदिनी पत्रकारांशी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले, ते मी अमान्य मुळीच करीत नाही. तेव्हा सर्वसामान्‍यांच्‍या हातात पैसा घोळत होता. २००७ ते २०१२ या कालावधीत सर्वच क्षेत्रातील कामगार खूष होते, असे कामत यांनी सांगितले.

 goa government treasury empty
Viral: गोव्यातील विजमंत्र्यांचा ‘गरबा डान्स’

पाच नव्‍हे, २५ हजार द्यावेत!

खाजेकार, फुलकार, टॅक्सीवाले, मोटारसायकल पायलट, चणेकर या लोकांना सरकारकडून ५ हजारांचे अर्थसाहाय्‍य दिले जात आहे. वाढत्‍या महागाईत ही तुटपुंजी रक्कम कशी पुरेल. सरकारने अशा लोकांसाठी कमीत कमी १०० कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे व प्रत्येकाला कमीत कमी २० ते २५ हजार रुपये द्यावेत, असेही कामत यांनी सूचविले. सरकारी मदत कुणालाच पोहोचत नाही, अशी सर्वत्र चर्चा आहे. कंत्राटदार, ज्येष्ठ नागरिक तक्रार करीत असल्‍याकडेही कामत यांनी लक्ष वेधले.

 goa government treasury empty
पाच हजारांसाठी जनतेची चाललीय फरफट!

सेल्फीचा चांगला परिणामरस्त्यांवरील खड्डे पाहतानाचा माझ्या सेल्‍फीचा एवढा चांगला परिणाम होईल व तो हजारो लोकांपर्यंत पोहोचेल,

असे मला वाटले नव्हते. पण, या सेल्फीमुळे मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सर्वच रस्ते दुरुस्त करावयाचे आहेत, हे मान्य करावे लागले, असे कामत यांनी सांगितले. मी विरोधी पक्षनेता असल्‍याने राज्यात जे काही वाईट होत आहे, ते सरकारच्या निदर्शनास आणून देणे माझे कर्तव्य आहे. मी गप्प बसू शकत नाही. ‘सरकार लोकांच्या दारी’ असे म्हणण्यापेक्षा ‘लोक इस्पितळाच्या दारी’ असे म्हटले ते योग्य ठरेल, असेही कामत म्हणाले.

Related Stories

No stories found.