हजारो कोटींचे प्रकल्प पूर्ण होत असतानाही माझ्यावर अन्याय का होतो: कार्लुस आल्मेदा

आल्मेदा (Carlos Almeida) यांच्या प्रयत्नामुळे येथे तीन मजली इमारत अंदाजे १४ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. येत्या १८ महिन्यात सार्वजनिक बांधकाम इमारत विभाग वास्कोतील अग्निशमन दलाची इमारत बांधून देणार असल्याची माहिती मेनन यांनी दिली.
हजारो कोटींचे प्रकल्प पूर्ण होत असतानाही माझ्यावर अन्याय का होतो: कार्लुस आल्मेदा
वास्को येथील नवीन अग्निशमन दलाच्या इमारतीच्या पायाभरणी वेळी बोलताना आमदार कार्लुस आल्मेदा, बाजूस राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, राज्य अग्निशमन दलाचे संचालक अशोक मेनन, अजय कामत.Dainik Gomantak

दाबोळी: राज्य सरकारने वास्को (Vasco) येथील कदंब वाहतूक मंडळाच्या (Kadamba Transport Board) बसस्थानकाबरोबर प्रशासकीय इमारत बांधण्यास (To build an administrative building) आर्थिक सहकार्य केले नसल्याने आज माझ्या वर आरोप होत आहे. सरकारतर्फे विविध ठिकाणी हजारो कोटींची कामे प्रकल्प पूर्ण करीत असताना माझ्या वरच अन्याय का होतो? बस्थानक होत नसल्याने माझ्यावर सर्व स्थरातून टीका होत असली तरी माझे कार्य जनतेच्या विकासासाठी पूर्णत्वाकडे नेणार असल्याची प्रतिक्रिया वास्कोचे आमदार तथा राज्य कदंब वाहतूक मंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा (President Carlos Almeida) यांनी दिली.

वास्को येथील नवीन अग्निशमन दलाच्या इमारतीच्या पायाभरणी वेळी बोलताना आमदार कार्लुस आल्मेदा, बाजूस राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, राज्य अग्निशमन दलाचे संचालक अशोक मेनन, अजय कामत.
Goa: आजपासून कदंबची पुणे, मुंबई बससेवा सुरू

गोवा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे यांनी उत्तर व दक्षिण गोव्यातील मतदार संघातील भाजप मंडळातील गट समित्या, महिला मोर्चा व इतर पदाधिकार्‍यांच्या गाठीभेटी सुरू केले आहे. यात त्याच्या सर्व समित्या बरोबर गट समित्या कशा मजबूत कराव्या, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रचना कशी ठरवावी, यावर राज्य भाजप समितीने बैठका सुरू केले आहे. बुधवार (दि.१) राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे यांचा मुरगाव तालुक्यातील तिसरा दौरा वास्को मतदारसंघात होता. यावेळी त्याचे वास्को भाजप मंडळातर्फे ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. सर्वप्रथम त्याने वास्कोचे ग्रामदेव दामोदर देवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आमदार कार्लुस आल्मेदा, वास्को भाजप गटाध्यक्ष तथा राज्य कदंबा वाहतूक मंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक, रविंद्र भवन वास्कोचे अध्यक्ष जयंत जाधव, भाजप सचिव तथा नगरसेवक यतीन कामुर्लेकर, सचिव संदीप नार्वेकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अमय चोपडेकर, महिला मोर्चाच्या अध्यक्षा तथा नगरसेविका देविता आरोलकर, मोरगावच्या उपनगराध्यक्ष श्रद्धा महाले, गौरी नाईक, श्रीमती जेनिफर आल्मेदा, शलाका कांबळी, नगरसेवक नारायण बोरकर व इतर मोठ्या संख्याने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्ष तानावडे यांनी वास्कोतील हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण केले. नंतर त्यांनी वास्को सेंट अँड्र चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली.

वास्को येथील नवीन अग्निशमन दलाच्या इमारतीच्या पायाभरणी वेळी बोलताना आमदार कार्लुस आल्मेदा, बाजूस राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, राज्य अग्निशमन दलाचे संचालक अशोक मेनन, अजय कामत.
1 सप्टेंबरपासून कदंबची आंतरराज्य बससेवा सुरू

यावेळी वास्को येथील राज्य अग्निशमन दलाच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली. राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे, आमदार कार्लुस आल्मेदा, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, राज्य अग्निशमन दलाचे संचालक अशोक मेनन, उत्तर गोवा अग्निशमन दलाचे सहाय्यक संचालक अजय कामत, वास्को अग्निशमन दलाचे प्रमुख फ्रान्सिस्को मेंडिस उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा म्हणाले की वास्को शहर बंदराजवळ असल्याने येथे सुसज्ज असे अग्निशमन दलाची इमारत होणे गरजेची होती. यासाठी मी अनेक वेळा राज्य सरकारकडे नवीन अग्निशमन दलाची इमारत बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आज येथे सार्वजनिक बांधकाम इमारत विभागातर्फे इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. वास्को कदंब स्थानकाबरोबर प्रशासकीय इमारतीचे काम सुरू होत नसल्याने माझ्यावर सर्व स्थरातून टीका होत आहे. राज्य सरकार राज्यात विविध ठिकाणी हजारो कोटीचे प्रकल्प पूर्णत्वाकडे नेत आहे. मात्र वास्कोतील कदंब बस स्थानका बरोबर प्रशासकीय इमारत बांधण्यात आर्थिक सहकार्य करीत नसल्याने एका प्रकारे माझ्यावर टीका होत आहे. प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असते. यामुळे माझ्यावर टीका करणे योग्य नसल्याची माहिती आमदार आल्मेदा यांनी दिली.

यावेळी राज्यसभा खासदार तथा वास्को भाजप प्रभारी विनय तेंडुलकर यांनी केंद्र सरकारतर्फे येथील नवीन अग्निशमन दलाच्या इमारतीतील नवीन सामग्री देण्यासाठी आर्थिक सहकार्य देण्यासाठी पुढाकार घेणार अशी माहिती दिली. राज्य अग्निशमन दलाचे संचालक अशोक मेनन याने येथे नवीन इमारत बांधकाम येत असल्याने आमदार आल्मेदा यांचे खास करुन अभिनंदन केले. कारण आल्मेदा यांच्या प्रयत्नामुळे येथे तीन मजली इमारत अंदाजे १४ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. येत्या १८ महिन्यात सार्वजनिक बांधकाम इमारत विभाग वास्कोतील अग्निशमन दलाची इमारत बांधून देणार असल्याची माहिती मेनन यांनी शेवटी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवेश आमोणकर यांनी केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com