'महिलांवरील अत्याचाराबद्दल मुख्यमंत्री गप्प का?'

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

आपण गोव्याचे मुख्यमंत्री आहात व राज्यातील प्रत्येक नागरिकाचे रक्षण करणे हे आपल्या सरकारचे कर्तव्य आहे. गिरदोली-चांदर येथे एका तरुणीला रस्त्यात अडवून जबरदस्तीने जंतुनाशाक पाजले जाते. त्यावर मुख्यमंत्री साधे ट्विट वा भाष्य करीत नाहीत

मडगाव -गोव्यात महिलांवर अत्याचार वाढत आहेत, परंतु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यावर का बोलत नाहीत, असा सवाल काँग्रेसच्या नेत्या नेत्या व बाणावली मतदारसंघाच्या जिल्हा पंचायत उमेदवार रॉयला फर्नांडिस यांनी केला आहे. 

आपण गोव्याचे मुख्यमंत्री आहात व राज्यातील प्रत्येक नागरिकाचे रक्षण करणे हे आपल्या सरकारचे कर्तव्य आहे. गिरदोली-चांदर येथे एका तरुणीला रस्त्यात अडवून जबरदस्तीने जंतुनाशाक पाजले जाते. त्यावर मुख्यमंत्री साधे ट्विट वा भाष्य करीत नाहीत, तसेच चौकशीचे आदेश ही देत नाहीत हे अत्यंत दुर्दैवी आहे. 

महिलांवरील अत्याचारांबद्दल सरकारची अनास्था यावरून दिसते, असे फर्नांडिस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांच्याकडे गृह खात्याचा ताबा आहे. जनतेला सुरक्षा पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. गिरदोली-चांदर येथील घटनेचा तपास जलदगतीने करून गुन्हेगारांना पोलिसांनी ताबडतोब अटक करावी, अशी मागणी फर्नांडिस यांनी केली आहे.

संबंधित बातम्या