उत्पल पर्रीकरांना उमेदवारी का नाकारली?

उत्पल पर्रीकर पणजीत जिंकून येऊ शकत नाहीत. हे 'सत्य' भाजपने (BJP) आपल्या सर्वेक्षणातून शोधून काढले आहे.
Utpal Parrikar
Utpal Parrikar Dainik Gomantak

पणजी: गोव्याच्या एकमेव नेत्याने देशात हल्लीच्या काळात नाव कमवले ते मनोहर पर्रीकर आहेत आणि त्यांचा पुत्र उत्पल पर्रीकर भाजपच्या उमेदवारीसाठी याचना करतोय असं चित्र निर्माण झालं आहे. उत्पल पर्रीकर आजच्या घडीला पणजीत लढले तर त्यांचा पराभव अटळ आहे हे सुध्दा एक विस्तव आहे. परंतु तेवढ्यासाठीच त्यांना तिकीट नाकारले जात आहे का? पर्रीकरांनंतर सध्या गोव्यात (Goa) सत्तेची सूत्रे हातात घेऊन बसलेल्या घटकांना 'दुसरा पर्रीकर ' निर्माण करायचा नाही. हे या राजकीय नाट्यातले खरे वास्तव आहे. (Utpal Parrikar BJP Goa Assembly Election 2022)

Utpal Parrikar
डिचोलीतून निवडणूक लढवणार नाही: उत्पल पर्रीकर

उत्पल पर्रीकर पणजीत जिंकून येऊ शकत नाहीत. हे 'सत्य' भाजपने (BJP) आपल्या सर्वेक्षणातून शोधून काढले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आपली यंत्रणा लावून त्या वास्तवावर मोहर लगावली. परंतु मनोहर पर्रीकर अस्तित्वात असताना अमित शहा यांनी असा सर्व्हे केला असता तरीही तेच सत्य त्यांच्या हाती लागले असते. तेव्हा मनोहर पर्रीकरांना उमेदवारी नाकारण्याचे धैर्य भाजपला झाले असते का?

पणजी मतदारसंघात 23 टक्के कॅथलिक मतदार आहेत. त्यांची काही मते पर्रीकरांना जरुर मिळत त्याच प्रमाणे 20 टक्के असलेल्या सारस्वत मतांवरही त्यांची मदार असे. या मतदारसंघात आठ हजार बहुजन समाजाची मते आहेत. हे सर्व मतदार पर्रीकरांना अनुकूल होते का? तर नाही. पर्रीकरांनी मतदारांचा लोकानुनय कधी केला नाही परंतु आपल्या विरोधात बाबूश मोन्सेरात किंवा त्यांच्यासारखा आणखी प्रबळ उमेदवार उभा राहणार याची ते खबरदारी घेत. लक्षात घातलं पाहिजे 2012 ची निवडणूक सोडली- ज्यावेळेस ते भाजपच्या लाटेत 5500 च्या मताधिक्याने जिंकून आले- इतर वेळी ते 1200 ते 1400 या फरकाने ते जिंकून येत होते. यावरून हा मतदारसंघ गृहित धरता येत नाही हे सिध्द होते.

Utpal Parrikar
पर्रीकरांच्या कुटुंबासोबत भाजपकडून 'यूज अँड थ्रो' पॉलिसीचा वापर : केजरीवाल

जिंकण्याचा निकष लावून भाजपने यावेळी ज्यांना पणजीमध्ये (Panaji) उमेदवारी दिली आहे. ते विलक्षण वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. पर्रीकरांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मोन्सेरात काँग्रेस उमेदवार होते. त्यावेळी भाजपच्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मोन्सेरात यांना ' कलंकित व्यक्तिमत्त्व ' असे संबोधून ते जिंकून आल्यास पणजीतील महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल होणार असल्याची शेरेबाजी केली होती. पुढे याच मोन्सेरात यांच्यासह त्यांची पत्नी जेनिफर तसेच काँग्रेस- महाराष्ट्र महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून 13 जणांना भाजपात पावन करुन घेण्यात आले. आज जाहीर केलेल्या यादीत जिंकण्याचा निकष लावल्यामुळे आयात केलेले चेहरेच अधिक दिसत आहेत. कारण सत्तेवर तेच आहेत आणि भाजपने आपली तत्वे त्यांच्यापुढे गहाण ठेवल्याचा आरोप खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते करु लागले आहेत. या यादीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी गोव्यात भाजपचे रोप लावले ते संघ पठडीतील नेते श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर व मनोहर पर्रीकर यांची गोव्याच्या राजकारणातील सद्दी संपली असल्याचे नव्या बदललेल्या भाजपने दाखवून दिले आहे.

Utpal Parrikar
'उत्पल पर्रीकर यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नाही'

उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना तिकीट नाकारणे याचा दुसरा अर्थ मनोहर पर्रीकरांचे राष्ट्रीय अस्तित्व संपवणे असाही आहे. देशातील कोणत्याही नेत्याच्या पुत्राच्या नशिबी अशी अवहेलना आली नसेल. वास्तविक उत्पल पर्रीकरांनी साधे स्वप्न बाळगले होते ते आमदार बनण्याचे मुख्यमंत्रीपदाची अभिलाषाही त्यांनी कधी व्यक्त केली नाही या पार्श्वभूमीवर वर्षभरापूर्वी एक नवी रणनीती आखून पणजीमध्ये उत्पलला स्थानापन्न करणे भाजप नेत्यांना सहज शक्य होतं. तसे वचन केंद्रीय नेत्यांनीही त्यांना दिले होते. त्यामुळे भाजपच्या मूळ विचारधारेशी मंडळीही अनुकूल बनली असती परंतु पणजीसह तिसवाडी तालुक्यातील मोन्सेरात यांचा प्रभाव भाजपला अधिक महत्वाचा वाटला आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ' दुसरा पर्रीकर ' जोखमीचा वाटला. भाजपला नवीन नेता देशात कुठेच निर्माण करणे कदाचित नकोसे वाटू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com