Widow Customs : पुरे झाले बांगड्या फोडणे, मंगळसूत्र काढणे! केरीत महिलांचा एल्गार

विधवा प्रथा मोडीत : हेरवाड ते केरी-सत्तरी; महिलांचा आदर्शवत वैचारिक, कृतिशील प्रवास
Widow Customs
Widow CustomsDainik Gomantak

Widow Custom: महिला शिकली तर ती स्वतः सुधारणार आणि आपल्या प्रश्नांवर स्वतः आवाज उठवणार. त्‍याचा प्रत्‍यय केरी-सत्तरीत आला. येथील काही शिकलेल्या महिलांनी विधवांवर होण्याऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे.

ग्रामसभेत उपस्थित राहून विधवा प्रथेविरोधी ठराव संमत केला. मृत्‍यूपश्‍‍चात मृतदेहाला नग्‍न करून अंत्‍यविधी करण्‍यात येतात, या परंपरेविरोधातही पुढील काळात आवाज उठवला जाणार आहे.

जरी इथली पिढी शिक्षित होत असली तरी अशा विधवा प्रथेविरोधी आपापसांत बोलायच्या पलीकडे सर्वांसमोर कोणी ‘ब्र’ बोलायला तयार नव्हते. इथल्या महिलांमध्ये तर या विषयी चीड होतीच.

पण आवाज उठवायचा कसा आणि सुरुवात कोण करणार याबाबत मात्र अनभिज्ञता होती. जेव्हा महाराष्ट्रातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथेविरोधी ठराव संमत केला तेव्हा या महिलांच्या मनात बदलाची जाणीव निर्माण झाली.

Widow Customs
Goa Art: कलाकारांसाठी आनंदाची बातमी! यापुढे ‘कोमल कोठारी’ पुरस्‍कार विभागून दिला जाणार नाही

या प्रथांविरोधी उठवला आवाज

  • एखाद्या पुरुषाचे निधन झाल्यावर तिच्या पत्नीला घराच्या ओसरीवर प्रेतासमोर आणले जाते. जर तो ऐकत नसेल तर तिला ओढत आणतात.

  • त्यानंतर तिला फुले माळतात, कुंकू लावतात व तिची शेवटची म्हणून ओटी भरतात आणि लगेच तिला चढवलेला शृंगार ओरबाडून काढतात.

  • त्यात फुले काढणे, हातातील बांगड्या फोडणे, मंगळसूत्र काढणे असे प्रकार सर्व पुरुषांसमोर केले जातात. त्यावेळी तिथे कोणत्याही स्त्रीला ठेवत नाहीत.

  • नवऱ्याच्‍या मृत्‍यूपश्‍‍चात विधवा महिलेला पुढचे बारा दिवस एकटीच ठेवणे, तिला दुसऱ्या सुहासिनी महिला न भेटणे, तिचे सामाजिक आणि धार्मिक कार्यात बाजूला करणे अशा अनेक प्रथा ग्रामीण भागात अजूनही सुरू आहेत.

  • प्रेताच्या अंत्यविधीप्रसंगी त्यांचे कपडे काढण्‍याची अजूनही अनेक ठिकाणी पद्धत आहे. त्‍यावरही जागृती होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com