बाळंगाळ करसंगेत वन्यप्राण्यांचा वावर

panther
panther

बोरी

बाळंगाळ, करसंगेच्या रानात काळा बिबटा फिरत असून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील रहिवासी दत्तप्रसाद प्रभुदेसाई आणि संजय देसाई यांनी केली आहे.
बाळंगाळ करसंगे येथील वनराईत गवे, रानडुक्कर आणि आता काळा बिबटाही हैदोस घालू लागला आहे. कोविड-19 च्या टाळेबंदीच्या काळात सर्वत्र वाहतूक बंद होती. तेव्हा शांत झालेल्या या भागात कोणीच फिरकत नसल्याने वन्यप्राणी येथील रस्त्यावरून मुक्तपणे फिरत होते. आतातर पावसाळा सुरुवात झाल्याने या वस्तीत हे वन्यप्राणी मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. या वस्तीत फिरणाऱ्या या वन्यप्राण्यांमुळे आणि काळ्याबिबट्या मुळे नागरिकांना धोका संभवतो. या भरवस्तीत गव्या रेड्याचा कळप तसेच रानडुक्करांचा कळप फिरत असल्याचे दत्तप्रसाद प्रभुदेसाई आणि संजय देसाई यांनी पाहिले असून या वन्यप्राण्यांपासून नागरिकांना धोका पोचण्यापूर्वी वनखात्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com