फेसबुक माध्यमाद्वारे होणार आंतरराष्ट्रीय योगदिन

Dainik gomantak
शुक्रवार, 19 जून 2020

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी सकाळी सहा वाजता देशातील सगळ्या राज्यातील प्रत्येकी जिल्ह्यामध्ये (जास्त करून दहा हजार जिल्हे) ब्लॉग यांच्या समन्वयाने दहा लाख लोकांना पंजीकृत केले जाणार आहे.

सासष्टी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी सकाळी सहा वाजता देशातील सगळ्या राज्यातील प्रत्येकी जिल्ह्यामध्ये (जास्त करून दहा हजार जिल्हे) ब्लॉग यांच्या समन्वयाने दहा लाख लोकांना पंजीकृत केले जाणार आहे. इच्छुक कुटुंबीयांना आपल्या घरीच फेसबुक लाईनच्या माध्यमातून जोडले जाणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय योग संस्थेचे गोवा केंद्राचे संयोजक आचार्य राजेश ठक्कर यांनी दिली. राजेश ठक्कर हे आंतरराष्ट्रीय योग संस्था गोवा राज्याचे नवीन संयोजक आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२०च्या आयोजनासाठी अंतरराष्ट्रीय योग संस्थेद्वारे गोव्यामध्ये निर्देशाने ‘योगा करो’ हा कार्यक्रम संपन्न केला जाणार आहे. यानिमित्त आपली योग संस्था ‘योग करो’च्या माध्यमातून भारतामध्ये घराघरात योगा पोहचविण्याचे कार्य करणार आहे असे राजेश ठक्कर यांनी सांगितले.
देशात तसेच गोव्याच्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये योग दिवसाच्या आयोजनासाठी लोकांना जोडण्यासाठी तयार केलेले ब्लॉग पूर्ण झालेले आहेत. या माध्यमातून देशाच्या सगळ्या क्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांना या कार्यक्रमात सहभागी होता येईल हे सुनिश्चित केले आहे असे योगा करो संस्थानाचे संस्थापक 'योग गुरु मंगेश त्रिवेदी यांनी सांगितले. लोकांच्या चांगल्या स्वास्थ्याला केंद्रस्थानी ठेवून ‘योगा करो’ हे मिशन सुरू करण्यात आलेले असून सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित बातम्या