रस्त्यांवरील अपघातात जाणाऱ्या बळींची भाजप सरकार जबाबदारी घेणार का? दिगंबर कामतांचा सवाल  

digambar kamat 1.jpg
digambar kamat 1.jpg

मडगाव : राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील  भाजप सरकार योग्य रस्ते तसेच इतर साधनसुविधा पुरविण्यास सपशेल अपयशी ठरले असून आता वाहतूक नियमभंगासाठी दंडाची  रक्कम वाढवून सामान्य लोकांना आर्थिक बोज्याखाली चिरडण्याचा डाव सरकारने आखला आहे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे. तसेच, योग्य व आवश्यक रस्ता सुविधा पुरविण्यास अपयशी ठरलेले मुख्यमंत्री खराब रस्त्यांमुळे अपघातात जीव गामावणाऱ्यांची जबाबदारी घेणार का,  असा सवालही दिगंबर कामत यांनी विचारला आहे. 

बाणावलीत आरोग्य केंद्र उभारणार - चर्चिल आलेमाव
 
मोटरवाहन चालक सरकारकडे या सुविधांसाठीच रस्ता कर भरतात. परंतु, मागील ९ वर्षात गोव्यातील रस्त्यांची चाळण झाली असल्याचे कामत यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर गोवा सरकारने राज्यातील मोटर वाहन कायदा उल्लंघनाच्या दंडाच्या रकमेत वाढ करण्यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेवर दिगंबर कामत यांनी आक्षेप घेतला असून ही अधिसूचना मागे न घेतल्यास गोव्यात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. वाहन चालक तसेच पादचारी यांना योग्य व सुरक्षित रस्ते तयार करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.  

तसेच, अयोग्य साधनसुविधा, सदोष वाहतूक व्यवस्थापनामुळे गोव्यात होणाऱ्या  रस्ता अपघातात जखमी होणारे व बळी जणाऱ्यांची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्विकारणे आवश्यक आहे.  रस्ता अपघातात जखमी होणाऱ्यांना तसेच आपले प्राण गमविणाऱ्यांच्या नातेवाईकांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक भरपाईतही वाढ झाली पाहिजे अशी मागणी कामत यांनी केली आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com