सांगेतून विधानसभा निवडणूक लढवणारच: सावित्री कवळेकर

सावित्री कवळेकर म्‍हणाल्‍या, माझी सभा होऊ नये म्हणून जितके प्रयत्न झाले, ते झिडकारून सांगेतील जनतेने सभेला उत्स्‍फूर्त प्रतिसाद दिला.
Savitri Kavlekar

Savitri Kavlekar

Dainik Gomantak 

सांगे: सावित्री कवळेकर यांनी सांगेतून विधानसभा निवडणूक लढवणारच, असा दृढनिश्चय जाहीर सभेत उपस्‍थित जनसमुदायासमोर केला. मला कोणीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी असंख्य कार्यकर्त्यांच्या बळावर माझा विजय निश्‍चित आहे. तमाम महिला आपला प्रतिनिधी म्हणून मला एक संधी देतील, असल्याचा विश्‍वास त्‍यांनी काल व्‍यक्त केला.

<div class="paragraphs"><p>Savitri Kavlekar</p></div>
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे

सावित्री कवळेकर (Savitri Kavlekar) यांनी गेल्या पाच वर्षांत सांगे (Sanguem) मतदारसंघात विविध क्षेत्रांत केलेल्या कार्याच्या जोरावर आज सांगे बस स्थानकावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत जोरदार शक्तिप्रदर्शन घडविले. यावेळी व्यासपीठावर कावरे-पिर्लाच्या सरपंच सिमरन गावकर, नगरसेवक मेशू डिकॉस्ता, सदानंद गावडे, आनंद नाईक, चंदन उनंदकर, माजी नगराध्यक्ष चांगुणा साळगावकर, पांडुरंग तारी, हर्षा सांबारी, सगुण गावकर, कांता कालेकर, महेश गावकर, चंद्रकांत गावकर, कुष्ठा गावकर, मनोज पर्येकर, नानू भांडोळकर, उदय गावकर, संतोष गावकर, जानू ताटे, जानू जोरे आदी ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी सरपंच, पंच उपस्थित होते.

यावेळी कवळेकर म्‍हणाल्‍या, माझी सभा होऊ नये म्हणून जितके प्रयत्न झाले, ते झिडकारून सांगेतील जनतेने सभेला उत्स्‍फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. ‘सावित्री कवळेकर बाहेरची’, असा प्रचार करणाऱ्या विरोधकांना सांगेतील मतदारांनी (Voters) सणसणीत उत्तर दिले आहे. मी अजूनही भाजप महिला उपाध्यक्ष असून नवनाथ नाईक सांगेत विखुरलेल्या भाजप कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचे काम करीत आहेत, ही त्यांची चूक आहे काय? पण पक्षाला वेठीस धरून पत्रकारांना हाताशी धरण्‍याचे प्रकार सुरू आहेत. सांगेत आपणच हुशार म्हणून सांगणाऱ्यांना दुसऱ्यांदा घरी का जावे लागले, हे आधी स्पष्ट करावे. हजारो कार्यकर्त्यांनी उपस्‍थिती लावल्‍यामुळे बसण्‍यास खुर्च्यासुद्धा कमी पडल्‍या, त्‍याबद्दल सावित्री यांनी त्‍यांची हात जोडून माफी मागितली. यावेळी मेशू डिकॉस्ता, महेश गावकर, हर्षा सांबारी, मनोज पर्येकर, सदानंद गावडे, संतोष गावकर यांनीही विचार व्यक्त केले. प्रशांत गावकर यांनी सूत्रसंचालन तर सुदेश भंडारी यांनी आभार व्यक्त केले. या सभेला सांगे मतदारसंघातून पाच हजारांहून अधिक उपस्थिती लाभली.

<div class="paragraphs"><p>Savitri Kavlekar</p></div>
ॲन्थोनी बार्बोजाला भाजपतर्फे उमेदवारीची शक्यता!

विरोधकांनी माझ्यातील दोष शोधण्‍यात दवडला वेळ

मी गेली पाच वर्षे काम करीत असून जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला. मी केलेली समाजसेवा कोणालाही दिसली नाही. पण विरोधकांनी केवळ माझ्यातील दोष शोधण्यात वेळ घालविला. आता कोणत्याही परिस्थितीत माघार न घेता सांगेतील मतदारांच्या जोरावर निवडणूक (Election) जिंकणार असल्याचा आत्मविश्वास सावित्री यांनी व्यक्त केला.

सांगेतील ‘त्या’ हिरण्यकश्‍यपूला संपवू : नवनाथ नाईक

नवनाथ नाईक म्हणाले, की सांगेत एक हिरण्यकश्यपू आहे. त्याने कार्यकर्त्यांना संपविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आम्ही सांगेच्या मातीतून वर आलो आहे याचा विसर पडू देऊ नये. एक तर आम्ही संपू किंवा हिरण्यकश्यपूला संपवू. मला भाजपाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी काही पत्रकारांना हाताशी धरून कारस्थान केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com