कृषी क्षेत्रातून रोजगार निर्मिती करणार

Will create employment from agriculture sector
Will create employment from agriculture sector

पणजी: रोजगार निर्मितीसाठी भात पीक प्रक्रिया, गोमंतकीय मल्टी फ्रुट्स प्रोसेसिंग, नारळ आणि काथा, स्पाईस आणि हर्बल, स्वयंमदत गटातर्फे अन्न प्रक्रिया, पॉटरी, शुगरकेन जॅगरी, खोला मिरची, भाजी पाला अशा कृषी क्षेत्रात विकास घडवून आणण्याचा निर्णय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला.


मुख्यमंत्र्यांनी यांनी सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाच्या स्फूर्ती योजनेखाली आत्मनिर्भर भारत, स्वंयपूर्ण गोवासाठी कृषी उत्पन्न विकास क्षेत्राची (क्लटर) आढावा बैठक घेतली. रोजगार निर्मिती, महसूल वाढ आणि सक्षम अर्थव्यवस्था यासाठी राज्यातील कृषी आणि फलोत्पादन कार्याला प्रोत्साहन देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. स्फूर्ती योजनेखाली गोव्यात विकसित करण्यात येणा-या विविध क्लस्टरवर बैठकीत चर्चा करण्यात आली. 


बैठकीत विविध सरकारी खाते आणि संस्थांना अंमलबजावणीत संस्था म्हणून तर संघटनाना विकसित करण्यात येणा-या योजनांना गती देण्यासाठी मंजुरी देण्यात आली. योजनेच्या अंमलबजावणीत आलेल्या अडथळ्यांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली आणि या समस्या सोडविण्यासाठीच्या विषयावरही चर्चा करण्यात आली आहे.  कोल्हापूर येथील टाईम या तांत्रिक संस्थेने नियोजित क्लस्टरवर प्रेजेंटेशन सादर केले.
कृषी संचालक ंनेविल आल्फोन्सो, उद्योग संचालक दीपक बांदेकर, टाईमचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे, जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदिप सरमुकादम आणि संबंधित खात्यातील इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित 
होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com