सहकारातून गोवा साकारू, सहकार सप्ताहानिमित्त मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

सहकार क्षेत्रात संस्थांनी सरकारवर अवलंबून चालणार नाही; तर सरकारला पाठिंबा दिला पाहिजे, त्यामुळे हे क्षेत्र वृद्धिंगत होणार आहे.
सहकारातून गोवा साकारू, सहकार सप्ताहानिमित्त मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
CM Pramod SawantDainik Gomantak

पणजी: सहकार क्षेत्रात संस्थांनी सरकारवर अवलंबून चालणार नाही; तर सरकारला पाठिंबा दिला पाहिजे, त्यामुळे हे क्षेत्र वृद्धिंगत होणार आहे. राज्याला सहकाराच्या माध्‍यमातून स्वयंपूर्ण बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यात राज्यातील जनतेने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केले. सहकार सप्ताहाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

पुढे बोलताना डॉ.सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्र्यांनी देशात सहकार चळवळीला जे महत्त्व दिले आहे, त्यामुळे राज्याच्या उन्नतीला वाव मिळत आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध होत आहे. मात्र, राज्यातील लोकांमध्ये ते कर्ज घेऊन व्यवसाय करण्याची इच्छाशक्ती नाही. सरकार जनतेचे ऐकून धोरणे ठरवीत असते. त्यांचा फायदा लोकांनी घ्यावा. सरकारने नाबार्डकडून घेतलेल्या कर्जांच्या व्याजात कपात झाली आहे. पूर्वी ते 7.5 टक्के होते, आता ते 2.5 टक्के इतके आहे.

CM Pramod Sawant
महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण: काँग्रेस

राज्याच्या विकासात सहकार संस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे. राज्यातील 5 हजार 78 पतसंस्था त्याबाबत मोलाची कामगिरी बजावत आहेत. सर्वसामान्य शेतकरी, मच्छीमार आणि इतर कामगार या संस्थांशी जोडले गेले आहेत. त्यांना सरकारच्या योजनांचा योग्य पद्धतीने लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रत्येक पंचायत क्षेत्रात जागृती करण्याचे काम हाती घेतले आहे, असे डॉ. सावंत म्हणाले.

सुरुवातीला सहकार युनियनचे अध्यक्ष श्रीकांत नाईक यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. त्यांनी संस्थांचे 15 लाखांचे अनुदान रखडले असून ते तात्काळ जमा करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी सदर रक्कम 19 डिसेंबरच्या आत जमा करण्याची ग्वाही यावेळी दिली. प्रसंगी नाबार्डच्या प्रधान व्यवस्थापिका उषा रमेश यांनी सहकार आणि विकास या संकल्पनेवर सुंदर विवेचन करीत उपस्थितांना सहकार खाते आणि कायद्यांबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी सहकार निबंधक अरविंद खुटकर, युनियनचे उपाध्यक्ष विठ्ठल गावस, प्रभारी मुख्याधिकारी पी. जी. मांद्रेकर उपस्थित होते. सहकारातून सर्वसामान्यांचा विकास होतो. विविध क्षेत्रांत कार्यरत व्यक्तींची बचत होते. त्यातून रोजगाराला वाव मिळतो. एकूणच सहकारातून सर्वांचा विकास होतो.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com