Goa : आयव्हर्मेक्टिन गोळ्यांबाबत पाठपुरावा करणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Goa : आयव्हर्मेक्टिन गोळ्यांबाबत पाठपुरावा करणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
pramod sawant.jpg

पणजी: गोव्यात सध्या आयव्हर्मेक्टिन (Ivermectin)  गोळ्याच्या (Tablets) खरेदीबाबतचा मुद्दा गाजत आहे. या मुद्दयावरुन गोवा सरकारवर (Goa government) टीकाही केली जात आहे. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. यावर आपण आरोग्य खात्याकडे ‘आयव्हर्मेक्टीन’च्या गोळ्या खरेदी करण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी गुरुवारी सांगितले. (Will follow up on ivermectin tablets : Chief Minister Pramod Sawant)

ते म्हणाले की, “आयव्हर्मेक्टिन गोळ्यांच्या विक्री करणारे सर्व वितरक प्रत्येक गोळीसाठी वेगवेगळे दर आकारत आहेत. मला या प्रकरणाची माहिती मिळाली असून आरोग्य विभागाकडेही त्याचा पाठपूरावा करणार आहे. नवीन कोविडच्या ‘प्रोफेलेक्सिस’ उपचार प्रोटोकॉलचा भाग म्हणून गोवा सरकारने ‘आयव्हर्मेक्टिन ’ गोळ्यांचे विनामूल्य वितरण जाहीर केल्याच्या जवळपास एक महिन्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी दावा केला की आरोग्य मंत्रालयाने सदर एकही गोळी खरेदी केलेली नाही.

 २२ कोटींचा आकडा आला कुठून ?
सावंत यांनी पत्रकारांना सांगितले की, “आम्ही ‘प्रोफेलेक्सिस ट्रीटमेंट’साठी ‘आयव्हर्मेक्टिन’ विकत घेतलेले नाही. एकही गोळी नाही.२२ कोटी रुपयांचा हा आकडा लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,”

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com