हळर्ण किल्ल्याकडे सरकार लक्ष देईल?

स्थानिकांचा सवाल: पर्यटनदृष्ट्या विकास नसल्याने पर्यटकांचा होतो अपेक्षाभंग
हळर्ण किल्ल्याकडे सरकार लक्ष देईल?
Harnai FortDainik Gomantak

मोरजी: पेडणे येथे शिवाजी महाराजांचा पूर्वीचा एक किल्ला आहे. या किल्ल्याला पुरातत्वीय दृष्ट्या महत्त्व असल्याचे घोषित करण्यात आले आहे. हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटन मोठ्या प्रमाणात इथे भेट देतात. एका बाजूने वाहणारी नदी आणि तिंन्ही बाजूने निसर्ग सौंदर्याचा वारसा लाभलेला हा किल्ला पर्यटकांना आकर्षित करतो. पण, हजारो मैल दूरवरून या किल्ल्याला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना तेथे ऐतिहासिक वास्तूची व्यवस्थित देखभाल केली नसल्याचे पाहून आणि पार्ट्या झोडणाऱ्या मद्यपींमुळे साचणाऱ्या बाटल्यांचा खच पाहिल्यावर त्यांचा अपेक्षाभंग होतो.

किल्ल्याच्या आत पूर्वीचे एक कौलारू घर आहे ज्यात छ. शिवाजी महाराजांचे शिलेदार राहायचे. या किल्ल्यात एक तुळसही आहे. आणि गोड्या पाण्याची विहीर आहे. या किल्ल्यात एक पूर्वीचा बोगदाही आहे, त्याचे मुख आता बंद केले आहे. बोगदा एका बाजूने साळ या गावात जोडला आहे, तर दुसऱ्या बाजूने याच गावातील डोंगराला जोडला आहे, असे पूर्वीचे लोक सांगतात. हा बोगदा मोपा पठाराला देखील जोडला आहे, असेही बोलले जाते. चारही बाजूंनी येणारे शत्रू नजरेत येतील, अशी योजना आखून या किल्ल्याची बांधणी केली होती. ती बांधणी पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

Harnai Fort
लाखेरेत 52 धनगर बांधव धोंड एकत्रितपणे पाळतात; लईराईचे व्रत

एकीकडे सरकार अशा पूर्वीच्या स्थळांचं सुशोभीकरण व जतन करणार असल्याचे सांगत आहे. परंतु या किल्ल्याकडे अजूनही कोणाची नजर वळलेली नाही. पूर्वीच्या छ. शिवाजी महाराजांच्या वस्तू या किल्ल्यात गंजत पडल्या आहेत. त्यांची कोणत्याही प्रकारे देखभाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे दुरून प्रवास करून आलेल्या पर्यटकांची इथे पोहोचताच निराशा होते. सरकार पर्यटनाला चालना देण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करत आहे. त्यात पर्यटनस्थळांचे सुशोभीकरण, देखभाल इतर खर्च असतो. परंतु या किल्ल्याचे अपेक्षित सुशोभीकरण कधी होणार, असा प्रश्न आता स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पर्यटनदृष्ट्या या स्थळाचे सुशोभीकरण केले असते, तरी येथे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली असती. एका बाजूने नदी असल्याने बोटिंग किंवा इतर पर्यटन आकर्षित सुविधा उपलब्ध करणे शक्य होते. पर्यटनाला चालना मिळावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.