हंगामी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेणार; आरोग्यमंत्री विश्वजित राणे

हंगामी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेणार; आरोग्यमंत्री विश्वजित राणे
rane 2.jpg

निवडणुका पूर्वी तुये येथील नवीन हॉस्पिटलमध्ये (Hospital) सर्व सोयी सुविधा उपलब्ध करणार ,शिवाय राज्यातील कोरोना काळात (covid19) ज्या हंगामी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा दिलेली आहे, त्यांना कायमस्वरूपी नोकरीत प्राधान्य क्रमाने घेतले जाईल आणि तेही निवडणुका पूर्वी अशी घोषणा आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Health Minister Vishwajit Rane) यांनी तुये पंचायत सभागृहात आरोग्य खात्यातर्फे डॉक्टर ,नर्स ,कर्मचारी , फ्रंट लाईन कर्मचारी यांचा गौरव सोहळा २२ रोजी सायंकाळी आयोजित केला होता त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. (Will hire seasonal employees permanently Health Minister Vishwajit Rane)

यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळ (Goa Tourism Development Corporation) चेरमेन तथा मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे (Dayanand Sopte) , सरपंच सुहास नाईक , आरोग्य संचालक डॉक्टर जॉज डायस , डॉक्टर राजेंद्र बोरकर , तुये आरोग्यधिकारी विद्या परब , मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब , डॉक्टर मनस्वी आळवे आदी उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक डॉक्टर मनस्वी आळवे यांनी तर रुपाली, किमया,नाविता आदींनी पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले .

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com