किनारे खचण्याची कारणे शोधण्यासाठी 'एनआयओ'कडून अभ्यास करणार : रोहन खंवटे

कोलवा किनाऱ्याची धूप थांबविण्यासाठी तातडीचे प्रयत्न
Rohan Khaunte
Rohan Khaunte Dainik Gomantak

मडगाव : बदलत्या हवामानाचा परिणाम दर्यातील लाटांवरही झालेला असून त्यांचा प्रवाह बदलू लागला आहे. याचा विपरीत परिणाम गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर होऊ लागला असून किनारपट्टी मोठ्या प्रमाणावर खचू लागली आहे.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी आज याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. किनाऱ्यांची ही धूप का होते आणि ती थांबविण्यासाठी कोणते उपाय घेता येणे शक्य आहेत याचा एनआयओ संस्थेकडून अभ्यास करून घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

Rohan Khaunte
गोव्यातील रस्ते जलमय होण्यामागील कारण आले समोर; नागरिकांतून नाराजी

लाटांचा प्रवाह बदलल्याने कोलवा समुद्र किनारा खचला असून पर्यटन खात्याने या किनाऱ्यावर लोकांना बसण्यासाठी चौकवजा सज्जे बांधले होते ते उन्मळून पडले आहेत.या भागातील रस्ताही काही प्रमाणात खचला आहे.

आज खंवटे यांनी त्याची पाहणी केली. त्यांच्या बरोबर स्थानिक आमदार व्हेंझी व्हिएगस व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजीनाल्ड लॉरेन्स हेही उपस्थित होते. कोलवा किनाऱ्याची होणारी धूप थांबवून धरण्यासाठी ताबडतोब आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत घेऊन उपाययोजना सुरू केली जाईल असे त्यांनी सांगितले.

कोलवा हा गोव्यातील महत्त्वाचा किनारा असून कित्येक पर्यटक तिथे येतात त्यामुळे केंद्र सरकारच्या स्वदेशदर्शन योजनेखाली या किनाऱ्यावर पर्यटकांसाठी सोई सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com