Goa Politics: मगो पक्षाशी युतीबाबत केजरीवालांचे सूचक मौन

आम आदमी पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांच्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Politics) युती होणार का?
Goa Politics: ढवळीकर बंधूं आणि अरविंद केजरीवाल
Goa Politics: ढवळीकर बंधूं आणि अरविंद केजरीवालDainik Gomantak

पणजी : आम आदमी पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांच्यात विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार का, याविषयी सरळ उत्तर देण्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी टाळले. (Will there be an alliance between AAP and Maharashtrawadi Gomantak Party for Assembly elections)

मंगळवारी सुदिन ढवळीकर यांच्यासोबतच्या बैठकीत युतीविषयी (Goa Politics) चर्चा झाली नाही, असे त्यांनी वारंवार सांगितले. याबाबत पुन्हा प्रश्न विचारल्यावर मात्र या भेटीत गोव्याच्या राजकारणाविषयी चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केले. मंगळवारी मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे नमूद करतानाच ती केवळ सदिच्छा भेट होती, असे सांगितले होते.

Goa Politics: ढवळीकर बंधूं आणि अरविंद केजरीवाल
Goa Politics: ढवळीकर बंधूंच्या केजरीवाल भेटीचा अर्थ काय ?

मगोतूनच आजवर सर्वाधिक आमदार फुटून गेलेले आहेत. अशा पक्षासोबत आप युती करणार का, असे विचारल्यावर ते म्हणाले, राजकीय चर्चा जरूर झाली. मात्र, दोन्ही पक्षांसोबत युती करण्यासंदर्भात ती नव्हती. मी पुन्हा महिनाभराने परत येणार आहे. मी ढवळीकर यांना दिल्लीत येऊन शाळा, दवाखाने, इस्पितळांचे काम कसे केले आहे ते पाहावे यासाठी निमंत्रित केले आहे. आमदार फुटीवर एवढा ‘आप’चा भर आहे तर पंजाबमध्येही आम आदमी पक्षाचे आमदार फुटले होते याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, आमचे तिथे आमदार फुटले होते ते खरे आहे. तसे होता कामा नये. तेथे झाले ते चुकीचेच झाले.

Goa Politics: ढवळीकर बंधूं आणि अरविंद केजरीवाल
Goa Politics: ‘आप’ने गोव्याच्या प्रादेशिक पक्षाशी युती केली तर...

दिल्लीत आमचे आमदार एकसंघ राहिले. ते फोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. गोव्यातही आम्ही जुने पक्ष, जुने राजकारण, जुने चेहरे यांना मागे टाकून म्हणूनच जनतेला नवा पक्ष, नवे चेहरे यांची साथ देण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com