रवींद्र भवन पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार; संकल्प आमोणकर यांची ग्वाही

Ravindra Bhava : रवींद्र भवनचे मुख्य सभागृह डागडुजीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आले आहे.
Sankalp Amonkar
Sankalp Amonkar Dainik Gomantak

रवींद्र भवन बायणा हे मुख्य प्रेक्षकागृह गेली दोन वर्षे कोणत्या कारणास्तव बंद आहे याची चौकशी करून ते लवकरात लवकर पून्हा कार्यान्वित करण्याचा माझा सरकार दरबारी प्रयत्न असेल अशी ग्वाही मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी मुरगाव तालुक्यातील कलाकारांना तसेच कलाप्रेमींना दिली.

Sankalp Amonkar
'खाणी सुरु करताना स्थानिक ट्रकांचा विचार व्हावा'

रवींद्र भवन बायणा येथे मिनी सभागृहात सम्राट क्लब वास्को आयोजित सम्राट संगीत महोत्सवात प्रमुख पाहुणे या नात्याने आमोणकर बोलत होते. रवींद्र भवनचे मुख्य सभागृह डागडुजीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रवींद्र भवन बायणामध्ये नाटक, तियात्र तसेच इतर मोठ्या कार्यक्रमांना पूर्णविराम लागला आहे. कलाकारांची खाण म्हणून संबोधलेल्या मुरगाव तालुक्यातील कलाकारांना कित्येक कार्यक्रमापासून वंचित राहावे लागले आहे. रवींद्र भवनचे फक्त मिनी सभागृह कार्यान्वित आहे. मात्र या मिनी सभागृहात नाटक तियात्र सारखे कार्यक्रम करू शकत नाही. कारण या सभागृहात फक्त दीडशे प्रेक्षक बसू शकतात.

दरम्यान मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर सम्राट संगीत महोत्सव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले असता त्यांच्या नजरेस सदर गोष्ट सम्राट क्लब अध्यक्ष जयराम पेडणेकर यांनी आणून दिली. त्यांनी सदर वीर सावरकर सभागृह कोणत्या कारणास्तव आजपर्यंत बंद आहे याची चौकशी करून त्याचा सरकार दरबारी पाठपुरावा करून हे मुख्य सभागृह लवकरात लवकर कार्यान्वित करण्यावर भर असेल अशी ग्वाही दिली.

मुरगाव तालुक्यातील कलाकारांचे आणि माझे जवळचे नाते असून रवींद्र भवनचे मुख्य सभागृह गेली दोन वर्षे बंद असल्याने कलाकार मुख्य कार्यक्रमांना मुकले आहे याची मला जाणीव आहे. मुरगाव तालुक्यातील कलाकारांमुळे बायणा रवींद्र भवनाची वास्तू उभी राहिली आहे. तसेच कार्यक्रमांना मध्येच खंड पडल्याने कलाकारांना अनेक मोठ्या कार्यक्रमापासून वंचित रहावे लागत आहे. याची चौकशी करून बंद असलेले मुख्य सभागृह लवकर कार्यान्वित करण्यात यावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com