'यास' चक्रीवादळाचा गोव्यावर परिणाम होणार? 

yaas cyclone 1.jpg
yaas cyclone 1.jpg

पणजी : अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तौक्ते हे चक्रीवादळ (tauktae cyclone)  निर्माण झाले होते. तौक्ते चक्रीवादळामुळे गोव्यासह इतर राज्यातील किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संकटाचा प्रभाव कमी  होतो न होतो तोच आता दुसऱ्या एका वादळाचे संकेत मिळाले आहेत. 26  मे रोजी उत्तर अंदमान (Andman)  समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या (Bangal)  उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यानुसार देशाच्या पूर्वेकडील किनारपट्टी (East Coast) भागातील राज्यांना हे नवे चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिली आहे. (Will 'Yaas' Cyclone affect Goa?) 

हवामान विभागाने या वादळाला  'यास' ('Yaas' Cyclone) असे नाव दिले आहे. 26 मे पर्यंत 'यास'चक्रीवादळ ('Yaas' Cyclone) बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे.  परंतु गोव्यावर त्याचे काही विशेष परिणाम होणार नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  22 मे रोजी उत्तर अंदमान समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज दिल्ली हवामान खात्याने (आयएमडी) व्यक्त केला आहे.  त्यानंतर पुढच्या 72 तासांत हे वादळ चक्रीवादळाच्या रूपात विकसित होईल  आणि 26  मेपर्यंत ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकणार असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीतून सावरत असताना आता दुसऱ्या चक्रीवादळाचा गोव्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याने आता गोमंतकीयांना दिलासा मिळाला आहे.  याबाबत बोलताना भारतीय हवामान विभागाचे वैज्ञानिक राहुल एम यांनी याबाबत माहिती दिली आहे.  यास' चक्रीवादळाचा गोव्यावर कोणताही परिणाम होण्याची अपेक्षा  नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.  गोव्याच्या किनारी भागातून तौक्ते ने 150 किमीचा प्रवास केल्यानंतर आता गोव्याचे आकाश स्वच्छ आणि साफ दिसत आहे.  रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि काही दिवस वादळी वारा सुटल्यानंतर गेल्या काही दिवसांत उन्हाळ्याच्या दिवसांत हवेत गारवा निर्माण झाला होता. दरम्यान, गुरुवारी आयएमडीने गोव्याचे  कमाल तापमान 28.7 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान  24.4 अंश सेल्सिअस नोंदविले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com