भरमसाठ आलेली वीज बिले मागे घ्या

अवित बगळी
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

भरमसाठ आलेली वीज बिले मागे घेत जनतेला दिलासा द्यावा यासाठी कॉंग्रेसने राज्यभर चालवलेल्या आंदोलनाचा आज (मंगळवारी) येथे समारोप केला. त्यांनी वीज खात्याच्या मुख्य कार्यालयासमोर वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या प्रतिमेचे दहन केले.

पणजी
भरमसाठ आलेली वीज बिले मागे घेत जनतेला दिलासा द्यावा यासाठी कॉंग्रेसने राज्यभर चालवलेल्या आंदोलनाचा आज (मंगळवारी) येथे समारोप केला. त्यांनी वीज खात्याच्या मुख्य कार्यालयासमोर वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या प्रतिमेचे दहन केले. त्याआधी मुख्य अभियंत्यांना त्यांनी निवेदनही सादर केले. या आंदोलनात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह राज्यभरातील कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर म्हणाले, हे आंदोलन प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर करण्यात आले. हे जनतेचे आंदोलन होते. भरमसाट वीज बिलामुळे लोक मेटाकुटीला आले होते. तालुका पातळीवर आम्ही आंदोलन केले त्यावेळी लोकांचे म्हणणे मुख्य कार्यालयापर्यंत पोचवा अशी विनंती तालुका पातळीवरील वीज अधिकाऱ्यांना केली होती. आज येथे चौकशी केल्यावर तालुका पातळीवरील एकही निवेदन मुख्य कार्यालयात पोचले नसल्याचे दिसले. यावरून सरकारचे प्रशासन जनतेच्या प्रश्नांप्रती किती असंवेदनशील झाले आहे हे दिसून येते. 
आंदोलनावेळी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, सरचिटणीस जनार्दन भंडारी, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस आदी उपस्थित होते.

संपादन ः संदीप कांबळे

Goa Goa Goa

संबंधित बातम्या