रेल्वे लेव्हल क्राॅसिंग बंद करण्याची परवानगी मागे घ्या

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी सासष्टीतील रेल्वे लेव्हल क्राॅसिंग बंद करण्याची दिलेली परवानगी त्वरीत मागे घ्या व दुपदरीकरणाची सर्व कामे थांबवा अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे. 

 मडगाव:  रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी सासष्टीतील रेल्वे लेव्हल क्राॅसिंग बंद करण्याची दिलेली परवानगी त्वरीत मागे घ्या व दुपदरीकरणाची सर्व कामे थांबवा अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे. 

आज गोव्यात पर्यावरणास धोका निर्माण करणाऱ्या रेल्वे दुपदरीकरण, राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार व वीज वाहिनी टाकण्याच्या प्रकल्पांना जनतेचा तीव्र विरोध आहे. कोळसा वाहतुकीसाठी रेल मार्गाचे दुपदरीकरण करण्याचा प्रयत्न सरकारने चालविला असुन, लोक आता रस्त्यावर उतरून त्याला विरोध करीत आहेत असे  कामत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.  

  बुधवारी नेसाय येथे लोकांनी दक्षिण पश्चिम रेल्वे व रेल्वे विकास निगमच्या रेल्वे दुपदरीकरण कामास विरोध करीत मध्यरात्री निदर्शने केली. 2 नोव्हेंबर रोजी गिरदोली - चांदर येथे तसेच 9 नोव्हेंबर रोजी दवर्ली येथे हे काम होणार असून या यावेळी लोक निदर्शने करणार आहेत.  त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे  कामत यांनी म्हटले आहे. 
जिल्हाधिकाऱ्यांनी लोकभावनेचा आदर करुन रेल्वेला दिलेली परवानगी ताबडतोब मागे घ्यावी व दुपदरीकरणासबंधीची सर्व कामे बंद करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी कामत यांनी केली आहे.

संबंधित बातम्या