पाच मिनिटांच्या अवधित पती-पत्नीचे निधन..!

Datta shirodkar
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

शशिकांत यांना एका ट्रकने ठोकर दिल्यामुळे त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर सुरवातीला म्हापसा व नंतर गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार सुरू होते. काल रात्री ११.४५ वाजता शशिकांत यांची प्राणज्योत मालवली.

पर्वरी, आपल्या जीवनामध्ये विधिलिखित काय आहे, हे कुणीच सांगू शकत नाही. पती-पत्नीचे नाते अतूट आणि जीवापाड प्रेम करणारे असते. वृद्धापकाळात घरात दोघेही एकत्र राहत असल्यानंतर त्यांचा दिवस जात नाही, अशीच एक दु:खद घटना पर्वरी परिसरात घडली. केवळ पाच मिनिटांच्या अवधित नवरा बायकोचे दु:खद निधन झाले. या घटनेमुळे पर्वरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सोनी-मोहिवालपेक्षा अमर प्रेमाची ही घटना आहे. तोर्डा-पर्वरी येथील निवृत्त शिक्षक शशिकांत एस. सावंत (वय ७२) हे तांत्रिक विद्यालयात ज्ञानार्जन करून निवृत्तीचे जीवन आरामात जगत होते. त्यात त्यांना पत्नी सोनाली ऊर्फ सुलभा (वय ६९) यांची सुरेख साथ होती. ते वाचन व अन्य विषयात रंगून जायचे, तर सोनाली ह्या समाजकार्य करायच्या. सुरवातीला कॉंग्रेस पक्षाची कार्यकर्त्या होत्या. पण, नंतर भाजप पक्षाच्या ध्येय धोरणाशी आकर्षित होऊन भाजपा पक्षाच्या कार्याला झोकून दिले होते. त्यांना तीन मुली आहेत. तिघांचे लग्न करून त्या आपापल्या घरी आनंदाने जीवन जगत आहेत. त्यांना अधूनमधून भेटायला मुली येत होत्या. गेल्या महिन्यात शशिकांत यांना एका ट्रकने ठोकर दिल्यामुळे त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर सुरवातीला म्हापसा व नंतर गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार सुरू होते. काल रात्री ११.४५ वाजता शशिकांत यांची प्राणज्योत मालवली. ही दु:खद बातमी सोनाली सावंत यांना कळताच पाच मिनिटांच्या अवधीतच म्हणजे ११.५० वाजता सोनाली यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या दु:खद घटनेमुळे परिसरात शोककळ पसरली आहे. स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संबंधित बातम्या