Coal Transportation: 'डोम स्ट्रक्चर उभारल्याशिवाय कोळसा हाताळणी वाढवू देणार नाही'

प्रदूषण रोखण्यासाठी डोम स्ट्रक्चर पूर्ण केल्‍याशिवाय या कंपन्यांना कोणत्‍याही परिस्‍थितीत कोळसा हाताळणी वाढविण्यास दिली जाणार नाही, असे मुरगावचे आमदार आमोणकर यांनी सांगितले.
Coal Transportation
Coal TransportationDainik Gomantak

Coal Transportation: कोळसा प्रदूषणाबाबत माझी भूमिका बदललेली नाही. कोळसा हाताळणी करणाऱ्या कंपन्यांना प्रदूषण रोखण्यासाठी घुमट रचना (डोम स्ट्रक्चर) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ते पूर्ण केल्‍याशिवाय या कंपन्यांना कोणत्‍याही परिस्‍थितीत कोळसा हाताळणी वाढविण्यास दिली जाणार नाही, असे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले.

मुरगाव बंदरात कोळसा हाताळणी वाढविण्यास केंद्राने मंजुरी दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आमोणकर म्हणाले, मुरगाव मतदारसंघातील लोकांना कोळसा प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसतो आणि जेव्हा जोरदार वारे वाहतात तेव्हा हे प्रदूषण वास्को आणि कुठ्ठाळीच्या बाजूला तसेच समुद्राच्या पलीकडे असलेल्या दोनापावलापर्यंत पसरते, असेही ते म्‍हणाले.

प्रदूषण वाढल्‍यास गप्‍प बसणार नाही

कोळसा प्रदूषणाच्या समस्येबद्दल जेएसडब्ल्यू व्यवस्थापनाशी यापूर्वीच संवाद साधला आहे आणि कोळसा प्रदूषण वाढल्यास आम्ही गप्प बसणार नाही.

प्रदूषण होणार नाही याची खात्री करण्यासाठी त्यांना नवीन उपायांचा अवलंब करावा लागेल तसेच प्रदूषण रोखण्यासाठी घुमट बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, एमपीटीसोबतचा त्यांचा भाडेपट्टी करार लवकरच संपुष्टात येईल आणि ते भाडेपट्टीच्या नूतनीकरणाची वाट पाहत आहेत.

Coal Transportation
Coal Transportation: 'कोळसा हाताळणी कायमस्वरुपी बंद करा'

कोळसा हाताळणी करणाऱ्या कंपन्या आणि सरकारशी माझी चर्चा झालेली आहे. या कंपन्‍यांना स्‍पष्‍टपणे बजावण्‍यात आले आहे की, जोपर्यंत ते घुमट रचना तयार करत नाहीत तोपर्यंत त्यांना जास्त माल हाताळू दिला जाणार नाही. - संकल्‍प आमोणकर, मुरगावचे आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com