Positive News: बधाई हो लडकी हुई! मोले येथे इमर्जन्सी प्रेग्नेंसी केसला आरोग्य खात्याचा जलद प्रतिसाद; आई बाळ सुरक्षित

याबाबतची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ट्विट करीत दिली आहे
Women Delivery At Ambulance In Goa
Women Delivery At Ambulance In GoaDainik Gomantak

Woman Delivery At Ambulance In Goa: एका गरोदर महिलेला प्रसूतिसाठी रुग्णालयात घेवून जात असताना महिलेने शासकीय रुग्णवाहिकेतच एका बाळाला जन्म दिला आहे. ही घटना भरकट्टे मोले येथे रुग्णवाहिकेत घडली. पॅरामेडीक पुंडलिक सुतार यांनी रुग्णवाहिकेत महिलेची प्रसूती केली.

याबाबतची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ट्विट करीत दिली आहे. आरोग्यसेवेतील सर्वोत्तम गोवा मॉडेल बनवण्यासाठी टीम्सच्या या जलद कृती आणि वचनबद्धतेचे मी कौतुक करतो असे ट्विटमध्ये म्हटले.

Women Delivery At Ambulance In Goa
Vijai Sardesai: विजय सरदेसाईंच्या नावाने फेसबूकवर फेक अकाऊंट; सायबर पोलिसांत तक्रार

याबाबत आरोग्यमंत्री राणे यांनी ट्विट केले व याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 49 मिनिटांच्या सुमारास भरकट्टे मोले येथे रुग्णवाहिकेत एका महिलेची सुरक्षित प्रसूति करण्यात आली.

पॅरामेडीक पुंडलिक सुतार यांनी आपल्या कौशल्यांचा वापर करीत महिलेची सुरक्षित प्रसूति केली. आई आणि बाळ दोघेही आता सुरक्षित आणि निरोगी आहेत. दोघांनाही फोंडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल.

आमच्या आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांनी इमर्जन्सी प्रेग्नेंसी केसला दिलेला हा अविश्वसनीय प्रतिसाद कार्यक्षमता आणि समर्पण वृत्ती दर्शवितो. आरोग्यसेवेतील सर्वोत्तम गोवा मॉडेल बनवण्यासाठी टीम्सच्या या जलद कृती आणि वचनबद्धतेचे मी कौतुक करतो असे ट्विटमध्ये म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com