धक्कादायक! कोलवाळ कारागृहात महिला कैद्याकडून सुरक्षारक्षक महिलेलाच मारहाण

Colvale Jail Crime : तुरुंग प्रशासनाकडून पोलिस तक्रार करण्यास टाळाटाळ
धक्कादायक! कोलवाळ कारागृहात महिला कैद्याकडून सुरक्षारक्षक महिलेलाच मारहाण
Colvale Jail CrimeDainik Gomantak

कोलवाळ कारागृहात विविध प्रकरणांनी नेहमीच चर्चेत असते. यावेळीही अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोलवाळ कारागृहातील एका विदेशी महिला कैद्याकडून कारागृहातील सुरक्षारक्षक महिलेला मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र तुरुंग प्रशासनाकडून पोलिस तक्रार करण्यास टाळाटाळ करत असल्याचे म्हटले जात आहे. (Woman Prisoner Beats Women Security guard in Colvale jail)

Colvale Jail Crime
मोरजी येथील कथीत बेकायदा डोंगरकाप प्रकरण चिघळले

कारागृहात वारंवार होणाऱ्या मारहाणीच्या प्रकरणामुळे कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, मध्यंतरी कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात अधुनमधून कैद्यांमधील हाणामारीची प्रकरणे ही सुरूच आहेत. या कारागृहातील रशियन कैद्याला स्वयंपाक विभागातील काही कैद्यांनी एकत्रित होऊन बेदम मारहाण केली. त्याच्या अगोदर त्यांनी एका नायजेरियन कैद्याला पैशांच्या व्यवहारावरून मारहाण केली होती. त्यामुळे कारागृहातील कैद्यांची सुरक्षा हे चिंतेचा विषय बनला आहे. कैद्यांचे काही अधिकाऱ्यांशीही लागेबांधे असल्यामुळेच असे प्रकार घडूनही त्याकडे डोळेझाक केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.