गोवा वेल्हा येथिल हॉटेलात दिवसाढवळ्या महिलेवर चाकू हल्ला

ती गोवा वेल्हा येथील एका चहाच्या दुकानात नाश्‍ता करण्यासाठी बसली होती. त्याचवेळी एक युवक समोरच्या टेबलावर बसला होता. तो वारंवार तिच्याकडे पाहून लैंगिक चाळे करत होता.
गोवा वेल्हा येथिल हॉटेलात दिवसाढवळ्या महिलेवर चाकू हल्ला
woman was stabbed in broad daylight at hotel in Goa Velha Dainik Gomantak

पणजी: राज्‍यात अलीकडे गुन्हेगारीची प्रकरणे वाढत आहेत. त्यातच महिला असुरक्षित असल्याचा तसेच कायदा व सुव्यवस्था कोलमडल्‍याचा आरोप विरोधक वारंवार करत आहेत. त्‍यास बळकटी देणारी घटना आज गोवा वेल्‍हा येथे घडली. तेथील एका हॉटेलात एका तरुणाने चाकू दाखवून महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आगशी पोलिसांनी मिलाग्रीस गोन्साल्विस (46) याला ताब्‍यात घेतले. नंतर तो मनोरुग्ण असल्‍याचे समजताच त्याची रवानगी मनोरुग्ण इस्पितळात करण्यात आली.

woman was stabbed in broad daylight at hotel in Goa Velha
बदल्याची भावना! मास्तरणीला विधवा करण्याचा विद्यार्थ्याने आखला डाव

मिळालेल्‍या माहितीनुसार, सोशल मीडियावर एका व्यासपीठाच्या पदाधिकारी असलेल्या देवसुरभी यदुवंशी या महिलेवर काल सकाळी दिवसाढवळ्या एका व्यक्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती तिने स्वतः व्हिडिओ व्हायरल करून दिली. तसेच तिने आगशी पोलिसांत तक्रारही दिली. तक्रारीत नमूद केल्‍यानुसार, ती गोवा वेल्हा येथील एका चहाच्या दुकानात नाश्‍ता करण्यासाठी बसली होती. त्याचवेळी एक युवक समोरच्या टेबलावर बसला होता. तो वारंवार तिच्याकडे पाहून लैंगिक चाळे करत होता. ती उठली व बिल देण्यासाठी काऊंटर जात असताना एकटक पाहण्याबाबत तिने त्‍याला जाब विचारला. त्‍यामुळे चिडलेल्‍या त्‍या तरुणाने खिशात असलेला चाकू काढला व तिच्या अंगावर धावून आला. हा सर्व प्रकार हॉटेलमध्‍ये उपस्‍थित असलेल्‍या ग्राहकांसमोर घडला. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला. दरम्‍यान, त्‍या मनोरुग्‍णाने जाताना या महिलेला तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून विद्रूप करण्याची धमकीही दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

woman was stabbed in broad daylight at hotel in Goa Velha
'वडिलांचे पितृछत्र' हरवलेल्या मोरजी येथील विजया शेटगावकरची कहाणी..

या घटनेनंतर यदुवंशी यांनी आगशी पोलिस स्थानकात फोन केला. त्‍यानुसार क्षणाचा विलंबही न करता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हॉटेलातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्‍या मदतीने पोलिसांनी त्या तरुणाचा शोध घेतला व चौकशी केली असता तो मनोरुग्ण असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. सध्‍या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचे नातेवाईक परदेशात असून तो एकटाच आगशी येथे राहतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी मनोरुग्ण इस्पितळात केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com