Panchayat Election : पंचायतींमध्ये अवतरणार महिलाराज

33 टक्के आरक्षण ; 62 सरपंच, तर 127 पदे उपसरपंचांसाठी राखीव
Women in goa Panchayat
Women in goa Panchayat Dainik Gomantak

पणजी : राज्यातील 186 पंचायतींची अटीतटीची निवडणूक पार पडून 5038 उमेदवारांमधून 1528 पंचसदस्य अखेर निवडून आले. मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि समर्थकांबरोबरची फोटोग्राफीही थंडावली आहे. आता सर्वांनाच सरपंच आणि उपसरपंच पदाचे वेध लागले असून या निवडीसाठी आठ दिवसांचा अवधी मिळाल्याने लॉबिंग वाढले आहे.

हाती आलेल्या निकालांमधून भाजप समर्थकांची संख्या लक्षणीय असून विरोधकांना पंचायत निवडणुकीमध्ये आपली छाप पाडता आली नाही. आता उरली-सुरली सरपंच, उपसरपंच पदेही भाजप आपल्या खिशात टाकणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

(Women in goa Panchayat)

Women in goa Panchayat
Goa Freedom Fighter : देशभक्त जॉर्ज यांना 14 ऑगस्ट रोजी घेतले ताब्यात

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले, या निवडणुका पक्षीय पातळीवर झाल्या नव्हत्या. निवडून आलेल्यांपैकी भाजप समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आम्ही पक्ष म्हणून या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत उतरणार नाही. निवडून आलेल्या सदस्यांचा तो अधिकार आहे.

त्यांनी तो पार पाडावा. असे असले, तरी सरपंच पदासाठी लॉबिंग वाढले असून फोनाफोनी सुरू झाली आहे. यात मंत्री, आमदार यांना विनंती सुरू असून त्यांनी आपल्यासाठीच इतर पंचांना शब्द द्यावा, यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात आता सरपंच, उपसरपंच कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पंचायतराज कायद्याप्रमाणे सर्व स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. हाच निकष आता सरपंच पदासाठीही लागू आहे. त्यामुळे 186 पैकी 62 पंचायतींवर सरपंच म्हणून महिला निवडल्या जातील. याशिवाय सर्वसाधारण गटातूनही सरपंचपदी महिला येतील.

त्यामुळे हा आकडा 75 च्या वर जाईल, अशी शक्यता आहे. हीच स्थिती उपसरपंच पदासाठीही असून तुम्ही आम्हाला सरपंच पदासाठी मदत करा, आम्ही तुम्हाला उपसरपंच पदासाठी मदत करतो, अशा शर्तींनाही वेग आला आहे. उपसरपंच पदासाठी लॉबिंग सुरू आहे. सर्वसाधारण आणि आरक्षित मिळून 127 उपसरपंचपदी महिला विराजमान होतील. सरपंच आणि उपसरपंच महिलांचा आकडा 189 होत असून अन्य गटांतूनही महिला या पदांवर विराजमान होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक पंचायतीमध्ये महिलांची सत्ता अबाधित असेल.

सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक सोमवार, 22 ऑगस्ट रोजी निश्‍चित केली आहे. यासाठी 186 पंचायतींमध्ये विशेष निवडणूक अधिकारी नेमले आहेत.

- सिद्धी हळर्णकर, संचालक, पंचायत खाते.

महिलांना सरपंचपदासाठी राखीव पंचायती - संख्या

 • सत्तरी - 4

 • डिचोली - 6

 • बार्देश - 11

 • पेडणे - 6

 • तिसवाडी - 6

 • सांगे - 3

 • धारबांदोडा - 1

 • केपे - 3

 • काणकोण - 3

 • सासष्टी - 9

 • मुरगाव - 4

 • फोंडा - 6

एकूण - 64

उपसरपंच

 • सत्तरी - 4 + 4

 • डिचोली - 6 +5

 • बार्देश - 11 + 1

 • पेडणे - 8 +6

 • तिसवाडी - 6 + 6

 • सांगे - 3 +1

 • धारबांदोडा - 1 + 3

 • केपे - 4 +4

 • काणकोण - 2 + 2

 • सासष्टी - 11 + 10

 • मुरगाव - 2 + 4

 • फोंडा - 6 + 7

एकूण - 127

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com