शिरोड्यात कृषी खात्यातर्फे मिरची, वांग्याची रोपटी वाटप

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंसहाय्य गटाच्या माध्यमाने कृषी खात्यामार्फत मिळणाऱ्या कृषी उत्पादन वाढविण्यासाठीच्या अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ उठवून आपल्या बागायती शेतीत अधिकाधिक उत्‍पादन घेऊन आत्मनिर्भर व्हावे,

शिरोडा:  ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंसहाय्य गटाच्या माध्यमाने कृषी खात्यामार्फत मिळणाऱ्या कृषी उत्पादन वाढविण्यासाठीच्या अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ उठवून आपल्या बागायती शेतीत अधिकाधिक उत्‍पादन घेऊन आत्मनिर्भर व्हावे, असे शिरोडा भाजपच्या डॉ. गौरी शिरोडकर यांनी केले.

रविवार ८ रोजी पंचवाडी गावातील जितोणे माळ येथील दोन स्वयंसहाय्य गटाच्या महिलांना मिरची आणि वांगी रोपटी वितरित करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. शिरोडकर बोलत होते. याप्रसंगी शिरोडा भाजप मंडळचे सरचिटणीस अवधूत नाईक, माजी जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत आदी मान्यवर उपस्थित होते. या पाहुण्यांच्या हस्ते स्वयंसहाय्य गटाच्या महिलांना मिरची व वांगीची रोपटी देण्यात आली. अवधूत नाईक यांनी स्वागत केले. तर नारायण कामत यांनी आभार  मानले.

संबंधित बातम्या