मोर्ले सत्तरीतील स्वच्छतेसाठी 'त्या' चार जणींचे योगदान महत्त्वाचे

तृप्ती गावकर, शुभांगी राणे, ललिता गावकर व राधिका राणे अशा या चार महिला सफाई कामगारांची नावे असून त्यांचे योगदान मोर्लेच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे ठरत आहे.
मोर्ले सत्तरीतील स्वच्छतेसाठी 'त्या' चार जणींचे योगदान महत्त्वाचे
मोर्ले सत्तरीतील सफाई कामगार दशरथ मोरजकर

पर्ये : सफाई कामगार म्हणजे कमी दर्जाचे काम. त्यात काम करणाऱ्यांना ना महत्व ना प्रसिद्धी. उलट कचऱ्याची उचल , विभागणी व्यवस्थित करीत नाहीत असा आरोप ठेवून सतत त्यांना हिणवले जाते. पण कचरा उचल करण्यापासून ते त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यापर्यतची कामे खूप महत्त्वाची आहेत. आणि अशाच प्रकारची काम करण्याची जबाबदारी मोर्ले सत्तरीतील 'त्या' चार महिला सफाई कामगार चांगल्या प्रकारे बजावत आहे. तृप्ती गावकर, शुभांगी राणे, ललिता गावकर व राधिका राणे अशा या चार महिला सफाई कामगारांची नावे असून त्यांचे योगदान मोर्लेच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे ठरत आहे.

मोर्ले सत्तरीतील सफाई कामगार
गोव्याचा इतिहास भुमिपुत्रांपासुन सुरु व्हावा; प्रजल साखरदांडे
Women Special Story
Women Special Story दशरथ मोरजकर

सत्तरीतील मोर्ले ग्रामपंचायत क्षेत्रात घन व्यवस्थापन करण्यासाठी पंचायतीने या चार महिलांची नियुक्ती केली आहे. पंचायत क्षेत्रातील घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल करणे, पंचायतीच्या कचरा साठवून केंद्रात (शेड ) मध्ये तो ठेवणे आणि नंतर त्या सर्व प्रकारच्या सुक्या कचऱ्याची वेगवेगळ्या प्रकारे विभागणी करून ठेवणे आणि जेव्हा हा कचरा विकत घेण्यासाठी बाहेरील लोक येतात तेव्हा त्यांना त्यांची योग्य प्रकारे हाताळणी करण्याचे कामे किंवा पंचायत क्षेत्रातील कचऱ्याची ठिकाणे स्वच्छ करणे आदी कामे या चारही महिला मोठ्या आत्मीयतेने करतात. त्याच बरोबर जेव्हा गावात कचऱ्याची उचल करण्यासाठी जातात तेव्हा गावातील महिला वर्गाला घनकचरा विभागणी करण्याचा छोटासा पण महत्वाचा सल्ला देतात.

मोर्ले सत्तरीतील सफाई कामगार
क्रीडा खात्यातर्फे स्वच्छता मोहिमेचे आयोजन
Women Special Story
Women Special Story दशरथ मोरजकर

इथल्या ग्रामीण भागात सुका कचरा ज्यात प्लास्टिक, कागद, लोखंड, अल्युनिमियन आदी विविध 14 प्रकारचा 'सुका' कचरा पंचायत सफाई कामगार गोळा करून ठेवणे तर घरातील टाकाऊ भाजीपाला-अन्न पदार्थ अशा प्रकारचा 'ओला' कचरा आपल्या परस बागेत खड्डा खोदून कुजवणे असे त्या सांगत असतात. एका प्रकारे हा शिक्षण देण्याचा भाग त्या महिला करीत आहेत. सुरुवातीला गोवा मिनरल फाऊंडेशन बिगर सरकारी संस्थेने त्यांना कचरा विभागणीचे प्रशिक्षण दिले होते पण आता त्यांना या विषयाची जाणीव झाल्याने त्यांच्याकडून हे स्वच्छता राखण्याचे काम चांगल्या प्रकारे होत आहे. महिन्यातून काही अवघेच दिवस त्यांना हे काम मिळते तरीपण त्या आपल्या कामाकडे दुर्लक्ष नाही हे विशेष.

सफाई कामगारांचे काम तेवढेच महत्त्वाचे

आजारावर उपचार करण्याचे काम डॉक्टर करतात म्हणून डॉक्टरांना जास्त महत्त्व दिले जाते. या उलट बरेचसे आजार होण्याचे कारण दुर्गंधी असते. जेव्हा दुर्गंधी नसेल तेव्हा आजार असणार नाही. अशा वेळी जर सफाई कामगार दुर्गंधी हटविण्याचे काम करीत असेल तर आजारही नाहीसे होईल, म्हणजे या सफाई कामगारांचे कार्य ही डॉक्टराच्या कार्या एवढे महत्त्वाचे आहे असे मानायला हरकत नाही.

Related Stories

No stories found.