पणजीत कॉंग्रेसने रस्त्यावरच तळली भजी-पुरी; गॅस दरवाढीविरोधात आंदोलन

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

गोवा प्रदेश काँग्रेसच्या महिला विभागातर्फे आज पणजी शहरात ‘गॅस’चा दरवाढीविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.

पणजी : गोवा प्रदेश काँग्रेसच्या महिला विभागातर्फे काल पणजी शहरात ‘गॅस’चा दरवाढीविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. महिला काँग्रेसच्या अध्यक्ष ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पणजी येथील काँग्रेसच्या कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी रस्त्याकडेला चुली मांडल्या. पुरी तसेच भजी तयार करण्यात आली. 

‘स्वयंपूर्ण गोवा’चा डंका राष्ट्रीय पातळीवर गाजला; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे 1000 कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी

गॅस दरवाढीमुळे केंद्र सरकारचा जोरदार शब्दात निषेध व्यक्त करून वाढलेला गॅस दरवाढ त्वरित कमी करण्याची मागणी केली.  प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले की, ज्या वेळी काँग्रेसचे सरकार केंद्रांमध्ये होते त्यावेळी सिलिंडर स्वस्त होता. भाजपाच्या केंद्र सरकारने इंधन सोबत गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढवले त्यामुळे कोरोनामुळे त्रासलेल्या लोकांना आणखीन त्रास झालेला आहे.

शेतकऱ्यांच्‍या विनवण्‍यांकडे सरकारचे सोयीस्‍कर दुर्लक्ष?

लोकांना ज्या गोष्टीचा त्रास होतो त्या गोष्टी मांडणे हे आपले काम असून गॅस ही गरजेची गोष्ट असल्यामुळे ती कमी दरात उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे कुतिन्हो म्हणाल्या. केंद्र सरकारच्या फसलेल्या आर्थिक धोरणांमुळेच इंधन वाढ गॅस वाढ झालेली असून, गॅस व इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये मोठे संकट आल्याची टीका कुतिन्हो यांनी यावेळी केली. गॅस दरवाढीमुळे महिलांना स्वयंपाक घराचे बजेट बसवताना बरीच कसरत करावी लागत आहे. 

संबंधित बातम्या