अपयशाची नैतिक जबाबदारी स्विकारून भाजप सरकारने राजीनामे द्यावे

Womens Congress president Bina Naik said Goa BJP government should accept responsibility for the failure and resign
Womens Congress president Bina Naik said Goa BJP government should accept responsibility for the failure and resign

पणजी: कोविड लसीकरण मोहिमेला आलेल्या सार्वत्रिक अपयशाची जबाबदारी भाजप सरकारचीच  आहे. मुख्यमंत्री डाॕ. प्रमोद सावंत, त्यांचे मंत्रिमंडळ आणि आमदारांनी कोविड लसीकरणाचे व्यवस्थापन 5 मे पर्यंत ताब्यात घेऊन सुरळीत करावे, नसता अपयशाची नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी गोवा महिला काँग्रेस अध्यक्ष बीना नाईक यांनी केली आहे.(Womens Congress president Bina Naik said Goa BJP government should accept responsibility for the failure and resign)

राज्यातील करोना साथीच्या वाढत्या संसर्गाकडे बीना नाईक यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. कोविडमुळे आतापर्यंत 1 हजार 225 हून अधिक लोकांचे मृत्यू झाले असून, गेल्या वर्षभरात 24 हजार जणांना कोविडची  लागण झाली आहे. राज्यातील  जनतेला सरकार खोटी आश्वासनेच देत असून कोविड प्रतिबंध विषयक प्राथमिक सुविधा पुरविण्यास देखील अपयशी ठरले आहे. गोवा महिला काँग्रेसची ही मागणी आहे की, मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील दोन मजले तत्काळ खुले करून अधिक खाटा कोविड रूग्णांना उपलब्ध करून द्याव्यात.

कोविड लसीकरण मोहिमेचे राजकारण करीत असल्याबद्दल भाजप आणि सरकारी यंत्रणेवर जोरदार टीका करताना बीना नाईक म्हणाल्या की, 18 वर्षावरील युवकांना मोफत लस देण्याची घोषणा म्हणजे नगरपालिका निवडणुकीत 18 ते 45 वयोगटातील मतदारांना प्रभावित करण्याचा जुमला होता, हेच आता सिद्ध होत आहे. 1 मे पासून लसीकरण करणे शक्य नाही, हे माहीत असताना देखील सरकारने हे प्रचाराचे नाटक मात्र चालूच ठेवले.

सरकारच्या चुका उघड करताना नाईक म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी 30 एप्रिल रोजी लोकांना मूर्ख बनविणारे विधान केले की, त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. प्रत्यक्षात लोक शिस्तबद्धरीत्या सर्व प्रकारचे नियम पाळत होते. मुख्यमंत्री मात्र लसीकरण थांबल्यानंतर लोकांना सांगत होते. याचाच अर्थ असा आहे की सरकार लसीकरण मोहीम राबविण्यास व आवश्यक त्या सोयी पुरविण्यास सक्षम नाही.

घोषित केलेल्या 1 मे 2021 या तारखेपासून लसीकरण करण्यासाठी सरकारकडे आवश्यक त्या कोविड लसींचा साठा उपलब्ध नसताना त्याचवेळी खासगी इस्पितळांकडे मात्र लसींचा साठा उपलब्ध होतो, हे काय गौडबंगाल आहे, असा सवालही महिला काँग्रेस अध्यक्षांनी उपस्थित केला आहे.

गोव्यातील कोविड स्थिती हाताळण्यातील गेल्या वर्षीच्या त्रुटींची आठवण करून देताना बीना नाईक म्हणाल्या की, डाॕ. प्रमोद सावंत हे पहिले मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी गोव्याला हरित क्षेत्र जाहीर करून  कोविडमुळे झालेले 54 मृत्यू व रोज 3 हजार जणांना करोना संसर्ग होत असताना राज्यात करोनाचा काही धोका नसल्याचे सांगितले होते. त्यांची ही कृती त्यांचे पोस्टर बाॕय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखीच होती. दावोस येथील जागतिक व्यासपीठावर मोदी देखील भारताने करोनाविरूध्दचे युध्द जिंकल्याचा दावा करत होते. पण आज कोविड बाबतीत देशात लाजीरवाणी स्थिती निर्माण झाली आहे. चुकीच्या गोष्टींना प्राधान्य तसेच अकार्यक्षमतेबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजे.

सर्व शासकीय इस्पितळांमध्ये पुरेशा खाटा आणि आवश्यक आॕक्सिजन साठा उपलब्ध असल्याचा भाजप सरकारचा दावा खोटा असल्याचे सिध्द झाले असून, सरकारची ही कमतरता भरून काढण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांना करावे लागत आहे, याकडेही बीना नाईक यांनी लक्ष वेधले आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे दोन मजले कोविड रूग्णांवरील उपचारासाठी उपलब्ध असताना सरकार अपुऱ्या खाटा असल्याचे सांगत आहे. उपलब्ध पर्यायाचा वापर न करण्यामागे सरकारचा काही छुपा अजेंडा आहे का, असा सवालही बीना नाईक यांनी केला आहे.

राज्यातील कोविड स्थिती हाताळण्यात भाजप सरकारला सार्वत्रिक अपयश आले असल्याचा दावा करून बीना नाईक म्हणाल्या की, याचाच परिणाम म्हणून गोवा सरकार वाढत चालले कोविडचे बळी आणि मोठ्या प्रमाणात होत असलेली  करोनाची लागण या बाबतीतील खरी आकडेवारी लपवली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या आठवड्यात कोविड रूग्णांना पुरेशा खाटा पुरविणे, आॕक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देणे आणि लोकांना दिलेल्या आश्वासनानुसार ठरलेल्या वेळेत राज्यभर लसीकरण मोहीम राबवणे या सर्व बाबतीत पुरेशा तयारी अभावी भाजप सरकारची यंत्रणा कोलमडून पडली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com