महिला काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांचा राजीनामा; आपमध्ये करणार प्रवेश

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मार्च 2021

गोवा प्रदेश महिला काॅंग्रेसच्या अध्यक्ष अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्या आम आदमी पार्टीत प्रवेश करणार आहेत. 

मडगाव :  गोवा प्रदेश महिला काॅंग्रेसच्या अध्यक्ष अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्या आम आदमी पार्टीत प्रवेश करणार आहेत. 

जिल्हा पंचायतीच्या नावेलीच्या पोटनिवडणुकीत त्या काॅंग्रेसच्या उमेदवार होत्या. या निवडणुकीत झालेल्या पराभवास त्यांनी माजी मुख्यमंत्री व नावेलीचे आमदार लुईझीन फालेरो यांना जबाबदार धरून त्यांच्यावर जाहीर टिका केली होती. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनाही त्यांनी टिकेचे लक्ष्य केले होते. आलेमाव व फालेरो यांचे संगनमत असून  आलेमाव आगामी विधानसभा निवडणुकीत आपली कन्या वालंका यांना नावेलीत उतरवण्याचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले होते. (Womens Congress state president Pratima Kutinho resigns Will enter you)

गोवा दिल्लीच्याही पुढे; गोव्यातील तरुण नाही, तर मुलंही दारू पिऊ शकतात!

नावेलीच्या पोटनिवडणुकीत कुतिन्हो यांना दुसरे तर आम आदमी पार्टीच्या माटिल्डा डिसिल्वा यांना तिसरे स्थान मिळाले होते. या निवडणुकीत आपने 2400 मते मिळवून जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे नावेलीतील राजकीय समीकरणे बदलली असून या बदलत्या समीकरणातून कुतिन्हो यांच्या राजीनाम्याचे व संभाव्य आप प्रवेशाचे नाट्य घडले आहे. 

संबंधित बातम्या